बॉलीवुड सिनेसृष्टीत आजवर आपल्याला अनेक प्रेमकहाण्या पहायला मिळाल्या आहेत. त्यात बऱ्याचशा फारचं रंगबिरंगी असलेल्या आणि काहीशा हटके प्रकारच्या असल्याच्याही आपल्याला समजलं आहे. मुळात काही सिनेसृष्टीत जेवढ्या प्रेमकहाण्या अपुर्ण राहिल्या असतील तेवढ्या प्रमाणात काही यशस्वीदेखील झाल्याची गोष्ट पहायला मिळते. अनेकदा तर केवळ मोजक्याच सिनेसृष्टीतल्या या गोष्टी समोर आल्या.
त्यामुळे अनेक गोष्टी दडूनदेखील राहिल्या. रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांच्या बाबतीत गोष्ट काहीशी अशीच आहे. हे दोघेही कलाकार सिनेसृष्टीतले एकप्रकारचे अगदी मात्तबर कलाकार समजले जातात, अर्थात त्यांनी आजवर केलेल्या कामातून आपली एक ओळख निर्माण केली आहे, जी साहजिकचं उत्कृष्ट आहे. दोघांनीही आपल्या कामाच्या जोरावर एकापेक्षा एक अभिनय सादर करत या हिंदी सिनेमांना एकप्रकारची चांगली स्थिरता दिली असं म्हणता येऊ शकेल.
रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह ही जोडी खऱ्या आयुष्यात प्रचंड गाजली. या जोडीला रसिकप्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रेम दिलं आहे आणि या जोडीचा एकत्र स्वीकारही केला आहे. रसिकप्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करू शकणाऱ्या ठराविक जोड्यांपैकी एक म्हणजे, रत्ना आणि नसीरुद्दीन शाह.
तुम्हाला कदाचित त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत ही खास गोष्ट आजवर माहित झालीच नसेल. चला तर मग आपण जाणून घेऊयात त्या खास गोष्टीबद्दल. रत्ना पाठक वयाने 13 वर्षांनी नसीरुद्दीन यांच्यापेक्षा लहान आहेत. आणि अनेकांना आधी वाटलेलं वयाचं हे बंधन हे नातं फारकाळ टिकवणार नाही; पंरतु याऊलट सारंकाही घडलं. हे नात फारकाळ टिकून राहिलं आहे.
मुळात रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांची प्रथम भेट ही 1975 या सालात झाली होती. त्यावेळी दोघांमधे केवळ मैत्रीचचं नातं होतं. त्यानंतर पुढे चालून काही दिवसांनी एका नाटकात रत्ना यांना नसीरुद्दीन यांच्यासोबत काम करण्याची संधी चालून आली. त्यांनी ही संधी स्विकारली. आणि पुढे या नाटकाच्या सर्व एकूण एक प्रक्रियेत रत्ना या नसीरुद्दीन यांच्या प्रेमात पडल्या.
काही काळ सहवासात एकत्र घालवल्यानंतर दोघांनाही आपण एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याची जाणिव झाली. तुम्हाला आता प्रश्न पडेल की त्या काळात भारतात लिव्ह-इन चा संबंधही नसताना का आणि कशासाठी रत्ना व नसीरुद्दीन यांच्यावर लग्न न करता एकत्र राहण्याची वेळ आली? तर त्याचं झालं असं की, नसीरुद्दीन शाह यांचा पहिला विवाह झाला होता तो, परवीन मुराद यांच्यासोबत.
आणि त्यांच्यापासून नसीरुद्दीन शाह यांना एक मुलगीदेखील आहे. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याने नसीरुद्दीन त्या काळात वेगळे राहू लागले होते, नेमकचं त्यांच्या आयुष्यात रत्नाचं आगमन झालं. अनेकदा प्रयत्न करूनही पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न झाल्याने त्या वेळी नसीरुद्दीन आणि रत्ना पाठक यांनी लग्न न करताच एकत्र राहण्याचे ठरवले. त्या काळात लग्न न करता लिव्ह इन मधे राहणे फार कठीण गोष्ट होती. परंतु तरीही शेवटी अनेक वर्षे एकत्र राहून नंतर रत्ना पाठक व नसीरुद्दीन शाह यांनी लग्न केले. मुळात लग्नाच्या एवढ्या वर्षानंतरही आता दोघांचा संसार आनंदाने सुरू आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!