एक काळ हिंदी सिनेसृष्टीत असा होता की तिच्या अदांशिवाय एखाद्या सिनेमाच्या गाण्याचं पानही हालू शकत नसायचं, तिच्या अदा तिचे ठुमके यापुढे अनेक अभिनेत्र्या फिक्या पडत असायच्या आणि अर्थातचं ती अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. रवीना टंडन आणि गोविंदा या जोडीनेही एक काळ प्रचंड गाजवला आहे. रवीनाचे अनेक सिनेमे पडद्यावर जबरदस्त हिट गेल्याचेही आपण पाहिले आहे.

एकप्रकारे नव्वदच्या काळात मदमस्त समजली जाणारी बॉलीवुड गर्ल म्हणजे रवीना आज सिनेसृष्टीत बऱ्याच गोष्टींपासून दुर राहते. तसं जरी असलं तरी तिच्या बाबतीत काही गोष्टी नक्कीच खास राहिल्या आहेत. आज रवीना सिनेसृष्टीच्या झगमगाटापासून बरीच दुर आपल्या कुटुंबासोबत शांततेच जीवण जगत असल्याची पहायला मिळते. त्यात मध्यंतरी एकदा ती एका टिव्ही कार्यक्रमात नृत्य करताना पहायला मिळाली होती.

आणि तिच्या त्या नृत्याने त्यावेळीदेखील सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तुम्हाला मुळात रवीनाबद्दल सांगायचं म्हटलं तर ती केवळ एकतर टिव्ही अथवा सोशल मीडिया या दोनचं माध्यमातून आपल्या चाहत्यावर्गाशी संपर्कात असल्याची आढळून येते. मुळात 2004 या साली लग्न झालेल्या रवीनाला एकूण 4 मुलं आहेत.

तिने तिच्या सिनेसृष्टीतील करियरच्या अगदी भरभराटीच्या काळातच दोन मुलींना दत्तक घेतल्याच सर्वांनी पाहिलं होतं. त्यावेळी तिच्या या निर्णयाची अनेकांनी बरीच स्तुती केली होती. आणि कुटुंबात म्हणालं तर तिचा नवरा अनील याच्यापासून रवीनाला दोन मुलं आहेत. ती अजूनही लहान आहेत. परंतु रवीनाची मोठी मुलगी आता 16 वर्षांची झालेली पहायला मिळते आहे.

रवीनाच्या या मोठ्या मुलीचा काही दिवसांपूर्वीच १६ वा जन्मदिवस साजरा करण्यात आला. रवीनाच्या मोठ्या मुलीचं नाव राशा हे आहे. राशा थडानी दिसायला म्हटलं तर अगदी जणू रवीनाचीच कॉपी वाटेल अशी तिच्या चेहर्‍याची सुबक ठेवण आहे. तरूण असलेल्या राशाला पाहून अनेकांना नव्याने सिनेसृष्टीत आलेली रवीनाच जणू आठवून जाते.

राशा थडानी दिसायला हुबेहुब केवळ रवीना प्रमाणेच सुंदर नाही तर ती नृत्यात, अभिनयात अगदी रवीनासारखीच भासते. राशाच्या सोशल मीडियावर अनेक चाहते तिला पाहत असतात. अनेकांना हा प्रश्न पडतो की, आईच्या पावलांवर पाऊल ठेवणारी, नृत्यकलेत सुंदर असणारी, राशा आता नेमकं केव्हा तिचं बॉलीवुडमधे पदार्पण करणार? किंबहुना ती बॉलीवुडमधे येणार का?

राशाचं अजूनही शिक्षण पुर्ण झालं नसल्याने इतक्या लवकर तरी ती सिनेसृष्टीत येण्याची शक्यता थोडी कमीच आहे. परंतु भविष्यात निश्चितच पुढील काही काळात ती आपल्याला सिनेसृष्टीत पदार्पण करताना पहायला मिळू शकते. अनेक रसिकप्रेक्षकांना आजवर रवीनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रवीना व राशाची केमिस्ट्री समजलेली आहेच.

राशा आणि रवीना अनेकदा सोबतच फिरतात, अनेकदा दोघी मिळून एकत्रच शॉपिंगला जातात, दोघींच्या नात्यात एक प्रकारची मैत्रीही टिकून असल्याचं बऱ्याचदा पहायला मिळालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रवीनाच्या मुलीला अर्थातचं राशाला चांगलाच प्रतिसाद लोकांमधून मिळताना दिसून येतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!