अभिनेता शशांक केतकर याने नेहमीच रसिकप्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या तो सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेतही आला आहे. याच कारण म्हणजे शशांक नुकताच बाबा झाला आहे. शशांक केतकर याची पत्नी प्रियंका हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आणि हि बातमी खुद्द शशांकने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर रसिकप्रेक्षकांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

अनेक रसिकप्रेक्षकांच्या मनात बऱ्याच काळापासून शशांक अधिराज्य गाजवतो आहे. शशांक केतकर याने त्याच्या पहिल्या पत्नीपासून अर्थात तेजश्री प्रधान या अभिनेत्री पासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलं ते प्रियंकासोबत. आणि या दोघांच्या संसाराची वाट चांगल्या पद्धतीने चालू असल्याची पहायला मिळते आहे. 25 डिसेंबरला जेव्हा शशांक केतकर याने त्याची पत्नी प्रियंका प्रेग्नंट असल्याची खबर दिली होती तेव्हाच अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

आणि नुकताच तो आता बाबा झाला आहे. शशांक केतकरने सांताक्लॉज येणार असं म्हणत आपल्या पत्नीसोबत गोड फोटो शेअर करत ही बातमी दिली होती. आणि आता फायनली तो बाबा झाल्यानंतर त्याच्या नवजात बालकाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच सर्वत्र पसरलेला पहायला मिळतो आहे. शशांकने आपल्या मुलाचा छानसा फोटो शेअर करत त्याचं नाव काय ठेवलं आहे, याचीही खबर दिली आहे.

त्याने फोटोवर पोस्टमधे मेन्शन केलं आहे की, त्याच्या मुलाचं नाव “ऋग्वेद” असं असणार आहे. शशांक केतकर याने शेअर केलेल्या फोटोत त्याने आपल्या हातात बाळाला घेतलं आहे. आणि त्या बाळाच्या चेहऱ्यावर त्याने इमोजी लावत थोडासा सस्पेन्स टाईपमधे मुलाचा फोटो शेअर केला आहे. यामुळे मुलाचा चेहरा थोडा स्पष्ट होऊ शकत नाही. आणि चाहत्यांना मात्र मुलाचा चेहरा पाहण्याची फार ईच्छा होत आहे.

एकप्रकारे शशांक केतकर हा सोशल मीडियावर अलीकडे चांगलाच ॲक्टीव्ह असल्याचं पहायला मिळतं. तो बऱ्याचदा त्याची पत्नी प्रियंका हिचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. शशांकने शेअर केलेल्या फोटोवरून बाप आणि मुलामधील प्रेमाची अतुट भावना साहजिकचं शशांकच्या चेहऱ्यावर झळकत असल्याची पहायला मिळते.

शशांकने शेअर केलेल्या फोटोवर अभिनेता जितेंद्र जोशी यानेदेखील कमेंट करत म्हटलंय की, या गोष्टीइतका मोठा दुसरा आनंद नाही. प्रियंका आणि शशांक केतकर या दोघांच 2017 साली लग्न झालं होतं. शशांक केतकर याने आजवर “हे मन बावरे”, “होणार सुन मी या घरची”, या मालिकांमधून घराघरात पोहचत आला आहे. आणि आता पुन्हा नव्याने “पाहिले न मी तुला” या मालिकेतही तो आगळ्यावेगळ्या रूपात आपल्या सर्वांसमोर येणार आहे.

शशांक केतकरने मोठ्या पडद्यावरही चांगल्या सिनेमांमधून भुमिका पार पाडल्या आहेत.” 31 दिवस”,” वन वे तिकीट”,” एरॉन” यांसारखे चांगल्या कथानकांचे सिनेमे त्याने पार पाडले आहेत. शशांकची पत्नी प्रियंका ढवळे पेशाने तशी एक वकील आहे. आणि मुंबईत डोंबिवलीमधे तिचिआ जन्म आणि वाढदेखील झाली आहे.

शशांक तसा मुळात पुण्याचा असल्याने, ही मुंबई – पुणे जोडी तर खास जुळलेली पहायला मिळाली आहे. शशांकच शिक्षण तसं ऑस्ट्रेलियामधे झालेलं आहे. त्याने हळूहळू थिएटर अर्थात नाटकांमधे पाऊल ठेवत सुदर्शन रंगमचासोबत जॉईन होतं पुढची सिनेसृष्टीतली वाटचाल यशस्वी करून दाखवली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!