बिग बॉस 14 च्या रनर अपची लव्ह स्टोरी, हेलीकॉप्टर राईड करत गर्लफ्रेंडसोबत दिली लग्नाची चाहूल.

सध्या सगळीकडे सोशल मीडियावर बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची चर्चा चालू आहे. एकीकडे या पर्वाची विजेती ठरलेली रूबीना दिलेक पुन्हा दुसर्‍यांदा लग्नाचे फेरे घेणार आहे. तर दुसरीकडे या पर्वाचा रनर अप ठरलेला गायक राहूल वैद्य हा कलाकार आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

खरतरं गायक राहूल वैद्य हा इंडियन आयडॉलमधेही दुसऱ्या स्थानावर राहिला होता. त्याच्या कलेने नेहमीच रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. राहूल वैद्य याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता, अशी गत झाली होती. आणि बिग बॉसच्या या 14 व्या पर्वात राहूल वैद्य याला नव्याने पुन्हा नवा प्रेक्षक आणि नवा चाहतावर्ग मिळाला.

दिशा परमार हे नाव कदाचित तुम्ही याच बिग बॉसच्या घरात राहूलच्या तोंडून ऐकलं असेल. तर हे नाव साध नाव नसून ती अर्थात “दिशा परमार” ही राहूलची गर्लफ्रेंड आहे. तिच्या जन्मदिनाच्या मुहूर्तावर राहूलने थेट तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. आणि याच कार्यक्रमात नेमकी दिशाने आपली उपस्थिती दाखवत राहूल वैद्य याला सरप्राईज करत त्याच प्रपोज अक्सेप्ट केलं. अर्थात लग्नासाठी होकार दिला.

या दोघांनाही बिग बॉसच्या घरात ऑनस्क्रीन पाहून चाहत्यांनादेखील ही जोडी लुभावली होती. राहूल खरतरं एक हटके स्वभावाचा व्यक्ती आहे. त्याने नुकताच त्याच सोशल अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

या फोटोमधे राहूल आणि दिशा हे दोघेही थेट एका हेलीकॉप्टरमधे बसले आहेत. “चलो ले चले तुम्हें तारों के शहर में” असा कॅप्शन देत हा फोटो राहूल वैद्यने शेअर केल्याने दोघांच्या विवाहबंधनात अडकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशीच शक्यता आहे.

राहूल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाची तारीख कधी ठरणार हेच पाहणं केवळ आता बाकी आहे. राहूलने शेअर केलेल्या फोटोवरून तरी किमान राहूल आणि दिशा हे दोघे नुकतेच एका व्हॅकेशनवर जात असल्याची माहिती मिळाली आहे. दोघे एकमेकांच्या सहवासात काही काळ सुट्या एन्जाॅय करणार आहेत.

बिग बॉसच्या शेवटच्या भागातच जवळपास राहूल वैद्य याने दिशासोबत लग्न करण्याची घोषणा ऑनस्क्रीन केली असून, दोघांनी लग्नासाठी खरेदीही सुरू केली असल्याच पहायला मिळतं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळा अगदीच शेलकीत पार पडणार असल्याची खबर नुकतीच मिळाली आहे.

राहूल म्हणाला आहे की, जरी लग्नासाठी कमी पाहुण्यांना आमंत्रित केलं गेलं तरीदेखील त्याला त्याच्या लग्नात बॉलीवुडच्या दबंग सलमान खानची उपस्थिती लाभलेली मनापासून आवडेल. त्याची ही ईच्छा कदाचित बॉलिवूडचा दबंग सलमान पूर्ण करेल का? असंही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

चाहत्यांना मात्र राहूल व दिशा या जोडीला रेशीमगाठीत अडकताना पहायचं आहे. दिशा परमार ही एक टेलीव्हिजनच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आहे. तिने स्टार प्लसवरील पंखुडी या लीड भुमिकेच्या जोरावर आपला ठसा सिनेसृष्टीत उमटवला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!