बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवरातील सदस्य येत आहेत… काल सगळेच सदस्य खूप भावुक झाले होते… कारण प्रत्येक सदस्याच्या घरातून कोणी ना कोणी येत होते… ते त्यांना सल्ले देत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते… शिवानीच्या वडीलांनी, नचिकेत म्हणजेच नेहाच्या नवर्याने, हीनाच्या आईने सगळया सदस्यांशी आपुलकीने बातचीत केली… शिवानीने तिने लिहिलेले पत्र तिच्या वडिलांना वाचून दाखवले तर नचिकेतने नेहाचे पत्र वाचले… हीनाच्या वडिलांचा आवाज आला ज्यामुळे तिला अश्रु अनावर झाले पण हीनाची आई घरामध्ये आली आणि हीनाचे अश्रु थांबायचे नाव घेत नव्हते…
हीनाच्या आईने किशोरी ताईचे आभार मानले कारण त्यांच्या आधारामुळे असे वाटते की हीनासोबत कोणीतरी घरात आहे… विणाला सांगितले कधी कधी राग यायचा पण आता नाही येत नाही असेच एकत्र रहा आणि छान खेळा… त्यांनी रूपालीला विनंती केली की, हीनाला चुकीचे समजू नका, तिला मराठी येत नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे पण तिचा हेतु चुकीचा नसतो… नेहाला विचारले आता हीनाशी पहिल्यासारखे का नाही बोलत ? तिला इगनोर का करतेस ? शिवानीने हीनाच्या आईची माफी मागितली. त्यावर हीनाची आई म्हणाली, इतक हीनाला टार्गेट नका करू, तिच्या इतक मागे नका लागू…
मी कुणालाही चुकीच म्हणत नाहीये तुम्ही तुमच्या जागी बरोबर असाल पण हीनासोबत इतक चुकीचे नका वागू… जे मनात येत ते बोलतेस मग माफी मागतेस,पश्चाताप मग होतो ना, मग नका वागू अस तिच्याशी… हीनाच्या आईला अश्रु अनावर होत होते… त्यांनी शिवानीला सांगितले जे पण बोलाल ते विचार करून बोला…
- शिवानी आणि नेहाला हात जोडून विनंती केली, तिच्याबद्दल वाईट बोलू नका आम्हाला खूप त्रास होतो… सगळ्यांनी तिची काळजी घ्या…