बिग बॉस फेम जास्मिन भसीन ही अभिनेत्री सध्यातरी लग्नाच्या तयारीत असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. विशेष बाब म्हणजे, मुळात जास्मिन भसीन आणि ती ज्याच्यासोबत लग्नाचा विचार करत आहे तो अली गोनी दोघेही बिग बॉसच्या १४ व्या पर्वाचे स्पर्धक राहिले आहेत.

बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल याची शाश्वती खासकरून कोणी देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे नुकत्याच विजेत्या ठरलेल्या रूबीनाच लग्न मो’ड’ता मो’ड’ता वाचलं त्याचप्रमाणे दुसरीकडे एक नवं लग्न जुळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात जास्मिन भसीन हिला प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

दुसरीकडे अली गोनीचेही बिग बॉसमुळे चाहते वाढले आहेत. आणि या दोघांमधेही सध्या अ’फे’अ’र चालू असल्याच त्यांच्या एकमेकांबाबतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेकर केलेल्या पोस्टवरून दिसून येत आहे. सुरूवातीपासूनच बिग बॉसच्या घरात इतर काही जोड्यांमधे अ’फे’अ’र चालू असण्याची शक्यता व’र्त’व’ली जात असताना शेवटी या जोडीची गोष्ट समोर येताना पहायला मिळत आहे.

सध्या अलीच्या कुटुंबियांना लग्नाची बोलणी करण्यासाठी जास्मिन रवाना झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. नुकतचं दोघेही विमानतळावर एकत्र पाहिल्या गेले आहेत. असं म्हटल्या जात आहे की, दोघेही कदाचित जम्मूला रवाना झाले असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अली गोनी याच कुटुंब हे जम्मूमधेच वास्तव्यास आहे. तर आता ही गोष्ट पुढे कशा पद्धतीने वर्कआउट होते हे पाहणं नक्कीच रोमांचक ठरणार आहे.

बिग बॉस सुरू होऊन काही काळ गेल्यानंतरही जास्मिन बिग बॉसमधे फारशी ॲक्टीव्ह राहत नसल्याची माहिती मिळाली होती. परंतु जेव्हापासून अली गोनी या ताफ्यात शामिल झाला त्यानंतर तिचे बिग बॉसच्या घरातील जगणेच बदलून गेले आणि ती प्रत्येक गोष्टीत सक्रिय राहू लागली.

अनेकांच्या मते अली गोनी केवळ तिच्याकरताच बिग बॉसमधे गेला होता. एवढ्यावरच दोघे थांबले नाहीत तर बिग बॉसची समाप्ती होताना अलीने जास्मिनला डेटवर येण्याची विचारणादेखील केली होती. अली गोनी हा हिंदी टेलीव्हिजनच्या माध्यमातला एक चांगला परिचित चेहरा आहे. कुछ तो है तेरे मेरे दरमियां, ये है मोहब्बतें, नागिन, दिल ही तो है यांसारख्या मालिकांमधून तो रसिकप्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

एमटीव्हीच्या स्प्लिटव्हिलामधून एक स्पर्धक बनून आलेल्या अलीने आज स्वत:ची हिंदी टेलीव्हिजन क्षेत्रात एक चांगलीच ओळख बनवली आहे. त्याने सकारात्मक भुमिकांसोबत नकारात्मक भुमिकाही अधिक प्रभावीपणे आजवर साकारल्या आहेत. दुसरीकडे आपल्याला जर जास्मिनबद्दल पहायचं झालं तर तिने आजवर टशन ए इश्क, दिल से दिल तक, नागिन, खतरों के खिलाडी अशा टिव्ही मालिकांमधून आपली छा’प रसिकप्रेक्षकांवर उमटवली आहे.

याशिवाय तिची खास बात म्हणजे तिने आजवर मोठ्या पडद्यावरचे चांगले सिनेमेही केले आहेत. वनम, दिल्लूनोडू, वेट्टा, लेडीज ॲण्ड जेंटलमॅन अशा काही दाक्षिणात्य सिनेमांमधून तिने आपली अदाकारी दाखवली आहे. दाक्षिणात्य सिनेमांमुळे तिला विशेषत: रसिकप्रेक्षकांच्या बाबतीत संपूर्ण तमाम भारतवासियांच प्रेम लाभलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!