सध्या मराठी टेलीव्हिजनच्या क्षेत्रात अनेक बदल होताना आपल्याला दिवसेंदिवस पहायला मिळत आहेत. अशात काही मालिकांमधील चाहत्यांच्या लाडक्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकारदेखील बदलत असताना पहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे तुझं माझं जमतंय या मालिकेत पम्मी या भुमिकेसाठी प्रतिक्षा जाधव अपुर्वा नेमळेकर हिला रि’प्ले’स करणार आहे.

त्याचप्रमाणे अग्गबाई सासुबाई या मालिकेतल्या शुभ्रा या पात्राला अर्थात तेजश्री प्रधान हिला एक दुसरी अभिनेत्री रि’प्ले’स करत असल्याची बातमी आहे. आणि ही अभिनेत्री इतर कोणी नसून उमा पेंढारकर असणार आहे. याआधी उमाची स्वामिनी मालिकेतील पार्वतीबाईंची भुमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली होती. दुसरीकडे या मालिकेत सोहमचं पात्रदेखील बदलणार असल्याची चर्चा आहे.

त्याच्या भुमिकेसाठी कदाचित आशुतोष प’त्की त्याची जागा घेणार असल्याची शक्यता आहे. परंतु याबाबत अजूनही साशंकता आहे. तेजश्री प्रधान हिला आजवर रसिकप्रेक्षकांकडून मालिकेतील भुमिकांमुळे खुप सार प्रेम मिळालं आहे. परंतु अग्गबाई सासुबाई ही मालिका यापुढे ती करणार नसल्याचं सध्या स्पष्ट झालं आहे.

“अग्गबाई सासुबाई” एका ठराविक कथानकापासून सुरू झालेली गोष्ट आता पुढे “अग्गबाई सुनबाई” अशा नावाने नव्या स्वरूपात पुढील कथानकावर सुरू राहणार आहे. ज्यामधे आता उमाची वर्णी शुभ्रा या पात्रासाठी लागणार आहे. या मालिकेत शुभ्रा ही अभिजीत राजे व आसावरी यांची सुन म्हणून आपल्याला पहायला मिळते.

मुळातच मालिका अर्थात रोज चालवावं लागणारं कथानक असल्याने ते कधी कोणत्या वळणावर कोणत्या दिशेने चालल्या जाईल याची शा’श्व’ती नसते. असं असतानाही प्रेक्षकांची त्याबद्दल टि’कू’न राहणाऱ्या उत्सुकतेमुळे ते विशेष बनत जातं आणि काही पात्र कमी का’ळा’त आपल्या अभिनयातून मनात घर निर्माण करून जातात. जे की आजवर तेजश्री प्रधान हिने बखुबी केलं आहे.

अग्गबाई सासुबाई ही मालिका सध्या एका हर्षवर्धक मो’ड’व’र चालू असल्याने, या मालिकेतील सोहम अर्थात बबड्या सुधारलायं अशी सर्वत्र शक्यता निर्माण झाली आहे. पुढे तो काय करतो? हे पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी साहजिकचं कुतूहलं निर्माण झालं आहे.

निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांनी आजवर त्यांच्या भुमिका चांगल्या पद्धतीने वठवल्या आहेत. मागे एक वेळ या मालिकेवर अनेक प्रश्नचिन्ह प्रेक्षकांकडून उपस्थित राहिल्याने मालिका बं’द प’डू शकण्याची शक्यता होती, परंतु मालिकेत पुढे अधिक चांगल्या प्रकारच्या कथानकावर काम झाल्याने मालिका टिकून राहिली आणि पुन्हा मालिकेने आपली ठराविक जागा मिळवली. तेजश्री प्रधान याआधी जेव्हा होणार “सुन मी या घरची” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती तेव्हा तिची क्रेझ अजूनच वाढली आणि आपल्या दर्जेदार कलाकृतीमुळे ती महाराष्ट्रातील तमाम घराघरात पोहोचली.

तिने आजवर मराठी सिनेसृष्टीत अनेक चांगल्या भुमिका पार पा’ड’ल्या आहेत. शिवाय सिनेमांमधूनही ती मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ती सध्या काय करते, झेंडा, शर्यत, जजमेंट, ओली की सुकी अशा नानाविध प्रकारचे चित्रपट तिने केले आहेत.

तेजश्री कायमच आपल्या भुमिका वेगवेगळ्या साच्यात घालून एका चांगल्या कलाकाराची प्रचिती देत असते. तेजश्रीची खरी सुरूवात “ह्या गोजिरवाण्या घरात” या मालिकेमधील भुमिकेपासून झाली. त्यानंतर ती “लेक लाडकी ह्या घरची” या मालिकेतूनही आपल्या भेटीस आली. आता पुढे या शुभ्राची भुमिका नवी शुभ्रा अर्थात उमा पेंढारकर कशा पद्धतीने साकारते हे पाहणं निश्चितच उत्तम ठरणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!