गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला असून, दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावंत यांच्यासह ३० गिर्यारोहक कोकण कड्यावर रॅपलिंगसाठी आले होते. ते या मोहिमेचे नेतृत्व करत होते. शनिवारी संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते.
रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. इतर २९ जण हे टप्पा उतरूनही आले होते. सावंत हे दोराच्या साह्यानं रॅपलिंग करत असताना, बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं शोध घेण्यात येत होता. कोकण कड्याची उंची ही साधारण अठराशे फूट आहे. सावंत जिथून बेपत्ता झाले, ती उंची अंदाजे हजार फूट होती.
हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला असलेल्या गावापासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यांच्यासोबत असलेल्या इतर गिर्यारोहकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र, सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. आज शोध मोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला आहे, तो दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सावंत हे ट्रेकिंग क्षेत्रातलं मोठं नाव होतं. त्यांच्या अंदाजे तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘सह्याद्री’मधील नव्या वाटा शोधल्या होत्या त्यांच्या जाण्याने ट्रेकिंग क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं मत गड किल्ले संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.