एक मालिका खूप कमी वेळात झी मराठी वर लोकप्रिय झाली. आणि ती म्हणजे देवमाणूस. होय त्यातली सगळीच पात्रे प्रेक्षकांना खूप आवडतं आहेत. त्यातली कथा सांगायची पध्दत खूप भारी आहे.

आता देवमाणूस ही मालिका निरोप घेतेय असं कळलं जातंय. पण देवमाणूस मध्ये आत्ता शेवट जी लहान मुलगी मायरा भूमिका करत आहे ती खूप वेगळी आणि गोड काम करत आहे. त्या तर मायरा नेमकं कोण ? हे जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता लागलेली असेल तर चला मग जाणून घेऊयात.

सध्या मालिकेत काय चाललंय हेही तितकंच महत्वाचं. तर झी मराठीवरील “देवमाणूस” ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत डॉ अजितकुमारने केलेल्या कट कारस्थानांचा सुगावा एसीपी दिव्या सिंग घेत असल्याने या तपासाला आता लवकरच वेगळे वळण मिळणार आहे.

या मालिकेच्या जागी आता “रात्रीस खेळ चाले ३” ही नवी मालिका सुरु केली जात आहे त्यामुळे देवमाणूस मालिका आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. लोकप्रिय तर आहेच पण दुसऱ्या काही मालिका आहेत ज्या येणार आहेत. त्यामुळे देवमाणूस निरोप घेत आहे.

मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात दिव्या सिंग आणि तिची मुलगी मायरा या दोन नव्या पात्रांना अभिनयाची संधी मिळाली आहे. दिव्या सिंगची भूमिका नेहा खान साकारत आहे तर मालिकेतील मायराचे पात्र साकारणाऱ्या चिमुरडीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत….

देवमाणूस मालिकेत चिमुरड्या मायराचे पात्र साकारले आहे बालकलाकार ” अर्नवी खडसे” हिने. ३ ऑगस्ट २०१५ रोजी अर्नवीचा जन्म झाला. अर्नवीचे वडील योगेश खडसे हे मूळचे अमरावतीचे परंतु कामानिमित्त सध्या ते आपल्या कुटुंबासोबत पुण्यातच वास्तव्यास आहेत. अर्नवी ‘मिमी खडसे’ या नावानेही ओळखली जाते. तुम्हाला जाणून कौतुक वाटेल की अर्नवी अनेक नामवंत ब्रँडसाठी एक चाईल्ड मॉडेल म्हणून काम करत आहे.

एवढेच नाही तर यातून तिने अनेक बक्षीसंही आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. अर्नवी आणि तिची मोठी बहीण “चारवी” या दोघीही अनेक ब्रॅण्डसाठी मॉडेल म्हणून रॅम्पवॉक करताना दिसतात. जेनेलिया, रितेश देशमुख, दलजीत दोसांझ, अमेय वाघ अशा काही कलाकारांसोबत अर्नवीने जाहिरात, अल्बम तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून बालकलाकार म्हणून काम केले आहे.

एवढ्या कमी वयात फॅशनच्या दुनियेत तिने मिळवलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल. देवमाणूस मालिकेत तिला प्रथमच छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळत आहे . तिला मिळालेली ही संधी आणखी उंच भरारी घेण्यास निश्चितच कामी येईल हे वेगळे सांगायला नको… अभिनय आणि फॅशन दुनियेत अर्नवीला यापुढेही अमाप यश मिळो हीच एक सदिच्छा…कारण मालिकेतील तिचं निरागस काम हे खूप लेखण्या जोग आहे. त्यामुळे तिला पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.