सध्या सगळीकडेच लग्नसराई सुरू आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीस वैभव रेखीसोबत लग्न-गाठ बांधली. अत्यंत जवळच्या लोकांसमवेत हा समारंभ पा’र प’ड’ला. दिया आणि वैभव बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. वैभव हा मुंबई येथील व्यावसायिक असून वांद्रे येथील पाली हिल भा’गा’त राहतो.

ह्या लग्नाबाबत वैभवची माजी पत्नी योग प्रशिक्षक सुनैनाला बऱ्याच लोकांनी विचारलं असता तिने नुकतंच सोशल मीडियावरून आपलं मत लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. सुनैनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते: “मी सुनैना रेखी. तुम्ही माझं नाव ऐकलं असेलच, आणि जर नाही, तर आता सर्व बातम्यांत ते आहे. होय, माझ्या माजी पतीने दिया मिर्झाशी लग्न केले आहे.

ह्या लग्नामुळे मी आणि माझी मुलगी समायरा ठी’क आहे की नाही हे विचारण्यासाठी मला बरेच डी’ए’म आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजस येत आहे. मला तुमची समजण्यासाठी आणि तुमच्या का’ळ’जी’बद्दल धन्यवाद. आम्ही दोघी अगदी ठी’क आहोत, फक्त ठीक नाही, तर माझी मुलगी ह्या लग्नाबद्दल खूप उत्साही आहे”. मी काही व्हिडिओ पाहिले आहेत जिथे ती फुलं फे’क’त होती. तिच्यासाठी कुटुंबाचा हा खूपच चांगला विस्तार आहे. मुंबई मध्ये आमचे कोणतेही कुटुंब नाही, त्यामुळे तिचे हे नवीन कुटुंब छान आहे.”

“तसेच, मला हे ही सांगायचे आहे की लहान मुलांच्या आयुष्यात प्रेम दिसणे महत्वाचे आहे. समायरा लहान होती तेव्हा तिचे वडील आणि आई यांच्यात असे प्रेम तिला दिसू शकले नव्हते, पण तिला निदान आता ते प्रेम दिसेल. मी समायरासाठी, तिच्या वडिलांसाठी आणि दियासाठी खूप आनंदित आहे.” असेही सुनैना म्हणाली.

दियाने यापूर्वी 2014 मध्ये साहिल सा’गा’शी लग्न केले होते. हे लग्न केवळ 5 वर्षे टि’क’ले आणि 2019 मध्ये दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना ध’क्का बसला होता. दियाने तिच्या घटस्फो’टा’ची माहिती सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे दिली होती. हे करण्यामागील तिचे कारण असे होते की त्याबद्दल तिला कोणत्याही प्रकारच्या अ’फ’वा नको होत्या.

दियाने 2000 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिक ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. सध्या ती ‘वा’इ’ल्ड डॉग’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.