मित्रांनो!, एक तर आधीच ती आहे करोडोंची फेरारी कार, आणि त्यातही तिला वरून सोन्याने मढवलीय ती एका अमेरिकन भारतीयाने. त्याचे हे प्रताप पाहून सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रांची मात्र चांगलीच ‘सटकली’, ते म्हणाले… “तुमची श्रीमंती दाखवण्याची ही पद्धत नाही…”, सोन्याने मढवलेल्या ‘फेरारी’चा Video बघून आनंद महिंद्रा चांगलेच संतप्त झालेले दिसले.
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा Anand Mahindra हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या ट्विटलाही फॉलोअर्स देखील खूप आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी करोडो रुपयांच्या फेरारी कारचा फोटो पोस्ट केला आहे. Gold plated Ferrari of Indian american Man हा साधासुधा फोटो नाहीय, तर ती कार एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयाची आहे, त्यात ती फेरारी आहे.
आनंद महिंद्रांनी श्रीमंत लोकांना पैशांची उधळपट्टी आणि देखावा टाळण्याचा सल्ला दिला आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे सोन्याने मढवलेली अलिशान फेरारी कार फिरवणाऱ्या एका मूळ भारतीय-अमेरिकी नागरिकाचा व्हिडिओ शेअर केलाय.
I don’t know why this is going around on social media unless it is a lesson on how NOT to spend your money when you are wealthy… pic.twitter.com/0cpDRSZpnI
— anand mahindra (@anandmahindra) July 19, 2021
व्हिडिओमध्ये एक सोन्याने मढवलेली अलिशान फेरारी कार दिसत आहे, त्यात दोनजण बसताना दिसत आहेत. व्हिडिओसोबत ऑडियो ऐकायला येतोय. त्यात, “शुद्ध सोन्याच्या फेरारीसोबत एक मूळ भारतीय-अमेरिकी नागरिक..असं ऐकायला येतंय. हा व्हिडिओ शेअऱ करताना आनंद महिंद्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. “तुम्ही श्रीमंत असाल तर पैशांची उधळपट्टी कशी करू नये हे याचंच उदाहरण आहे…तरीही अशा गोष्टी सोशल मीडियावर का व्हायरल होतात मला कळत नाही”, अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रांनी हा व्हिडिओ शेअर करताना दिली आहे.
व्हि़डीओमध्ये एक सोनेरी रंगाची फेरारी कार (Gold Ferrari Car) दिसत आहे. यामध्ये दोन लोक आहेत. या व्हि़डीओमध्ये शद्ध सोन्याच्या फेरारी कारसोबत भारतीय अमेरिकी, असे म्हणतानाचा आवाज येत आहे. यावर आनंद महिंद्रांनी म्हटले की, मला माहिती नाही की हा सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे, श्रीमंताला आपला पैसा कसा खर्च करावा याचा धडा मिळायला हवा. पैसा कसा खर्च करू नये याचे उदाहरण.
54 सेकंदांचा हा व्हिडीओ 207k हून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तसेच 7,529 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आनंद महिंद्रांच्या या पोस्टला सोशल मीडियावर बरेचजण सहमत असल्याचे दिसत आहेत.एका युजरने म्हटले की मला समजत नाही की असे केल्याने काय मिळते. दुसऱ्या युजरने म्हटले की सुपरकारवर मला दया वाटत आहे. सोनेरी रंगाच्या आड लाल किंवा पिवळा रंग झाकला गेला आहे.
अन्य एका युजरने म्हटले की, प्रत्येक चमकणारी वस्तू सोने होत नाही. कारला महागड्या धातूने कोटिंग करणे पैशांचा अपव्यय आहे. काही लोक या महिंद्रांच्या या मताला असहमत देखील होते. तसे पहायला गेले तर ती एक हौस आहे. हौसेला मोल नसते. नाहीतर लोकांनी काही लाखांच्या कारसाठी लाख, दोन लाख रुपये खर्च करून फॅन्सी नंबर घेतले नसते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महिंद्रांनी ट्विटरवर Fiat 1100 या कारची एक जुनी जाहिरात शेअर केली होती. त्या जाहिरातीत Fiat 1100 ची किंमत फक्त ८,२०० रुपये असल्याचं त्यांनी अधोरेखीत केलं. जुन्या जाहिरातीच्या पेपर कटिंगसोबतच आनंद महिंद्रांनी “ते जुने चांगले दिवस….Ah the good old days असे कॅप्शन वापरले. त्यांच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांनाही जुने दिवस आठवले आणि त्यांच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली.