90 च्या दशकात बॉलीवूडच्या प्रत्येक चित्रपटाच्या गाण्यांमध्ये आपला आवाज देणारी अल्का याग्निक यांच्या गाण्यांचे लोक खूपच दिवाने होते. अल्का याग्निक आता 54 वर्षांच्या झाल्या आहेत.

ज्या काळात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या गाण्यांना पसंती मिळाली होती. त्यानंतर, ज्यांच्या गाण्यांना सर्वात जास्त पसंती मिळाली होती ती होती प्रसिद्ध गायिका अल्का याग्निक. अल्का याग्निक गेल्या काही वर्षांपासून गायन करत नाही. याचे कारण त्या गाण्यांतील बदल आणि आधुनिक जीवन पद्धतीला मानतात.

अल्का याग्निक यांनी 30 वर्ष त्यांच्या सुंदर आवाजाने बॉलिवूड प्रेक्षाकांच्या मनावर राज्य केले. अलकाने आतापर्यंत 1100 चित्रपटांमध्ये 2400 हून अधिक गाणी गायली आहेत. पार्श्वगायिका म्हणून त्यांना 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अल्का याग्निक यांचा जन्म कोलकात्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आपली आई शुभा याग्निक यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. गायिका अल्का याग्निकने लहानपणापासूनच गायन करण्याचे वेड होते. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी त्यांनी काम करण्यास सुरवात केली.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, अल्का याग्निक कोलकाता आकाशवाणीमध्ये गात होत्या. त्या भजनही गात असत वयाच्या दहाव्या वर्षी त्या आईसमवेत मुंबईत येथे आल्या आणि चित्रपट निर्माता राज कपूर यांना भेटल्या.

राज कपूर यांना अल्का याग्निकचा आवाज आवडला आणि लक्ष्मीकांत प्यारेलालशी त्यांची ओळख करुन दिली. अल्का याग्निक यांनी 1979 सालच्या ‘पायल की झंकार’ या चित्रपटाद्वारे पार्श्वगायिका म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी अल्का याग्निक यांना तब्बल 8 वर्षे सं’घ’र्ष करावा लागला. 1988 मधील ‘तेजाब’ या चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्यानंतर अल्का याग्निकला पार्श्वगायिका म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर, अल्का याग्निकने कधीही मागे वळून पाहिले नाही.

अल्का याग्निकने 1989 मध्ये नीरज कपूरसोबत लग्न केले. त्यांना सायशा नावाची एक मुलगी आहे. अलका 27 वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत आहेत. 12 डिसेंबर 2018 रोजी अलकाने त्यांच्या मुलीचे लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.