ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुजैन खान यांच्या घटस्फोटाला आता तब्बल ७ वर्ष उलटून जाताना पहायला मिळतं आहेत. आणि अशातच एक गोष्ट समोर येताना पहायला मिळते आहे ती म्हणजे, सुजैन ही अर्सलान गोनी याला सध्याच्या घडीला डेट करत आहे. अर्सलान गोनी हा बिग बॉस १४ च्या पर्वातील अली गोनी याचा भाऊ आहे.

शिवाय अर्सलान स्वत:देखील सध्या एका नव्या वेबसिरीजमधे झळकताना पहायला मिळणार आहे. “मै हिरो बोल रहा हूं” नावाची एक वेबसिरीज त्याने साईन केल्याची समजते आहे. तसं पहायला गेलं तर सुजैन ही गेल्या आठ दहा महिन्यांपासून त्याला ओळखते. टेलीव्हिजन क्षेत्रातील एका कॉमन मित्राच्या माध्यमातून दोघांची ओळख झाल्याची समजते. त्यानंतर सध्याच्या घडीला दोघे अगदी फारच एकमेकांच्या जवळ आल्याचे पहायला मिळतं आहेत.

 

ओळखीपासून मैत्री आणि नंतर आता हे नातं प्रेमाकडे वाटचाल करू लागल्याची चिन्हे आहेत. सुजैन आणि अर्सलान हे दोघेही हल्ली बऱ्याचदा सिनेसृष्टीत एकमेकांसोबतच वावरत असताना पहायला मिळत आहेत. एखाद्या कार्यक्रमात अथवा एखाद्या इतर कोणत्याही ठिकाणी जिथे अर्सलान हजर असेल तिथे सुजैन हजर असतेचं असं काहीस हे समीकरण तयार झालं आहे.

सुजैन खान हिने अलीकडे एकता कपूर आणि तिच्या इतर प्रोडक्शन हाउसेससोबतही चांगलीच जवळीकता वाढवल्याची दिसून येते. या जवळीकतेचं कारण अर्सलान त्याच्या एकता कपूर आणि इतर प्रोडक्शन हाउसेसच्या प्रोजेक्ट्समधे काम करत आहे. सुजैन आणि ऋतिक यांच्या नात्याबद्दल तर आजतागायत सर्वांना सर्वकाही ठाऊक आहेच.

त्याखेरीज काही गोष्टी म्हटल्या तर त्या म्हणजे अशा की, सुजैन ही स्वत: एका फिल्मी कुटुंबातून आलेली मुलगी आहे. तिचे वडील संजय खान हे एक मातब्बर अभिनेते होते. आपल्या अगदी घराशेजारी राहणाऱ्या सुजैनला वयाच्या १२ वर्षीच ऋतिक त्याच ह्रदय देऊन बसला होता, अर्थात वयाच्या १२ व्या वर्षी तो तिच्या प्रेमात पडला होता. परंतु ऋतिक पुढे चालून मनातली गोष्ट सुजैनला सांगू शकत नव्हता. आणि त्याला तिला थेट लग्नासाठी मागणी घालायची होती. मग त्यानंतर आपला जवळचा मित्र असलेल्या उदय चोपरा यांना ऋतिकने मनातली गोष्ट सांगितली.

उदय चोपरांनी ऋतिकला थोडा वेळ घेण्याचा सल्ला दिला. या दरम्यान सुजैन व ऋतिक दोघेही आपापल्या करियरमधे चांगलेच पुढे निघून गेले. आणि त्यानंतर सिनेसृष्टीत दोघांच्या हळूहळू भेटीगाठी होऊ लागल्या. आणि या फुललेल्या भेटीगाठींमधून दोघांच प्रेम बहरलं. मग २००० सालात दोघांनी एकमेकांशी विवाहगाठ बांधत लग्न केलं. ऋतिक सुजैनच्या नात्याला पुढेही चांगलाच बहर मिळाला.

दोघांना आज दोन मुले आहेत. नातं अगदी सुरळीत असताना कुठेतरी एक गोष्ट चुकीची झाली आणि दोघांच्या नात्यात नंतर दुरावा आला. आज दोघेही वेगळे झालेले पहायला मिळत आहेत. विभक्त झाले असले तरी मुलांसाठी अनेकदा दोघेही आपापल्या जागी पालकाची भुमिका बखुबीने निभावत आले आहेत. डिसेंबर २०१३ मधे ऋतिकने एक मुलाखत घेत खुलासा केला होता की, सुजैन कुटुंबापासून वेगळं व्हायचं ठरवत आहे.

तर या कौटुंबिक गोष्टींवर कुणीही आम्हाला प्रश्न विचारू नयेत. आम्ही आजवर एकत्र जगलेले १७ वर्षे आता कुठेतरी संपुष्टात येतील. हा प्रवास इथेच थांबेल. सुजैन मात्र आजवर ऋतिकपासून वेगळी झाली तरी फारशी इतर कोणासोबत कधीच पहायला मिळाली नव्हती. मात्र यावेळी तिला अर्सलानच्या जीवनात येण्याने कुणीतरी आपल मिळालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!