‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं पुन्हा एकदाछोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तिने ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ही मालिकानुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं.

मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. यासगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे हे टीआरपीच्याआकड्यांवरुन लक्षात येतंय. त्यामुळे सासूबाई प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहेत इतकं मात्र नक्की.