“बाप तसा बेटा’ असे अनेकदा तुम्ही देखील नक्कीच ऐकले असेलच. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे मानतात की, मूली ह्या मोठेपणी आपल्या आईच्या अंगवळणी जातात तर मुलं ही अधिकांशदा पाहता आपल्या वडिलांच्या सुप्त गुणांवर जातात.
कित्येक घरांत आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र आज आम्ही तुम्हांला मराठी सिनेसृष्टीतील एका अशा बाप- लेकाविषयी सांगणार आहोत. जे दोघेही एकमेकांच्या पूर्णपणे विरूद्ध आहेत. चला तर मग पाहूया, कोण बरं आहेत हे बापलेक.
मराठी सिनेसृष्टीच्या मखमली दुनियेत सुपरस्टार अभिनेते अशोक सराफ हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. एक नामांकित कलाकार, निखळ विनोदी अभिनयाने सर्व रसिक मायबापांचे मनोरंजन करणारे आपले अशोक काका.
तब्बल 4 दशकांपासून ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी- सराफ यांनी देखील मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची अप्रतिम छाप उमटवली आहे.
तर सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील “अग्ग बाई सासूबाई” या मालिकेनंतर “अग्ग बाई सूनबाई” या भन्नाट मालिकेतून अखंड मराठमोळ्या जनतेचे मनोरंजन करत आहेत. अशाप्रकारे अभिनेत्री अशोक सराफ आणि त्यांच्या सौभाग्यवती निवेदिता सराफ हे दोघेही आजही आपल्या अभिनयाची कला जोपासत आहेत.
परंतु या दाम्पत्याचा मुलगा मात्र यांना अ’प’वा’द ठरला आहे. कारण अभिनेते महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं जसे की आदिनाथ कोठारे, श्रेया पिळगावकर आणि अभिनय बेर्डे हे जसे आपल्या वडिलांच्या क्षेत्रात उत्कृष्ट नाव कमावत आहे.
परंतु तसे अशोक काकांचा मुलगा हा अभिनय कलेपासून दूरच राहिला. तसेच त्याने स्वतःच्या अत्यंत आवडीचे असे करियर निवडले आहे. तुम्हांला प्रश्न पडला असेल की, अनिकेत सराफ हा नेमकं असे अनोखे करतो तरी काय बरं…
हे प्रोफेशन निवडले अनिकेत सराफ याने: अनिकेत सराफ याने आपली आई निवेदिता सराफ हिचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. तो एक अभिनेता नाही तर एक शेफ आहे.
त्याला खमंग आणि रुचकर जेवण बनवण्याची आईपासून अवगत आहे. लहानपणापासून तो आपली आई निवेदिताला जेवण बनवताना पाहायचा. म्हणून त्याला जेवणाविषयी आवङ निर्माण झाली. यासाठी त्याने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता शेफ बनण्याचे ठरवले.
तुम्हांला ठाऊक आहे का, अनिकेतचे सर्व शिक्षण भारतात नव्हे, तर फ्रान्समध्ये पूर्ण झाले आहे. तो एक अप्रतिम शेफ आहे आणि त्याला पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूप छान बनवता येते. युट्यूबवर “निक सराफ” या नावाचे चॅनेल आहे. ज्यावर तो आपले न नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बनवून टाकतो.
आईचे स्वप्न केले पूर्ण: आपल्या एका मुलाखतीमध्ये निवेदिता सराफ यांनी सांगितले की, आपल्या मुलाने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करियर निवडावे, अशीच त्यांची आधीपासून इच्छा होती.
त्यामुळे अनिकेतने माझे स्वप्न खरे केलं आहे. तर अनिकेतचे वडील म्हणजे आपले अशोक काका यांना त्याच्या हातचे ब्राऊनी फार आवडतात. तर त्याच्या आईला अनिकेतने बनवलेला मार्बल केक खूप आवडतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.