बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अचानक लग्न करून लोकांना चकित केले होते. त्यावेळी अनुष्काचे करिअर नेमकेच सुरु झाले होते आणि खूप कमी कालावधीतच तिने यश संपादन केले. त्याचवेळी विराटही मैदानावर सतत धावांचा वर्षाव करत होता. दोघांच्या लग्नाला आता दोन वर्ष झाले आहेत. डिसेंबर 2017 मध्ये जेव्हा अनुष्का शर्माने विराट कोहलीशी लग्न केले तेव्हा ती 29 वर्षांची होती. काहीच दिवसांपूर्वी अनुष्काने सांगितले की तिने अभिनेत्री असून देखील खूप लहान वयातच लग्न का केले?

फिल्मफेअरशी संवाद साधताना अनुष्का म्हणाली कि, “आमचे प्रेक्षक आमच्या इंडस्ट्रीपेक्षा जास्त वाढले आहेत आणि त्यांचा खूप विकास देखील झाला आहे. आता दर्शकांना फक्त थिएटरच्या स्क्रीनवर कलाकारांना पाहण्यात रस आहे. त्यांना आमच्या वैयक्तिक जीवनाची पर्वा नाही किंवा त्यांना काही फरक देखील पडत नाही.’ अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढे म्हणाली, “आपण विवाहित आहात की आपण आई बनली बनलात याची दर्शकांना पर्वा नाही. आपण या पूर्वाग्रहातून बाहेर पडणे आवश्यक आहे. माझे लग्न वयाच्या 29 व्या वर्षी झाले होते जे एका अभिनेत्रीच्या दृष्टीने खूप कमी वय आहे आणि लग्न लवकर देखील झाले आहे.

मी प्रेमात पडले म्हणून मी हे लग्न केले… आणि मी विराटवर खूप प्रेम करते. विवाह ही एक गोष्ट आहे जी नात्याला पुढे घेऊन जाते. मी नेहमीच या बाजूने उभी राहिले आहे की स्त्रियांना समान वागणूक दिली पाहिजे.’

अभिनेत्री अनुष्का पुढे म्हणाली, “त्याची प्रामाणिकता हीच एक गोष्ट आहे ज्याचे मी खूप कौतुक करते. मी एक प्रामाणिक मुलगी आहे, म्हणून मला या गोष्टींबद्दल खूप माहिती आहे. मी त्याच्यासारख्या व्यक्तीला भेटले याबद्दल मला खूप आनंद झाला आहे, कारण आम्ही दोघेही पूर्ण प्रामाणिकपणे आमचे आयुष्य जगतो. माझ्या जवळ असा एक लाइफ पार्टनर आहे जो काहीही खोटे बोलत नाही… सर्व काही खरेच बोलतो. ‘

अभिनेत्री अनुष्का म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना मला मनात घा’ब’रा’यचं नाही. जर एखादा माणूस लग्न करण्यास आणि काम करण्यास घा’ब’र’त नसेल तर स्त्रियांच्या बाबतीत असे का होऊ नये? ‘

11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एकमेकांशी लग्न केले. या दोन्ही सिलेब्रेटींनी रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यात बॉलिवूडमधील तसेच राजकीय जगतातील पाहुण्यांचा समावेश होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.