बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अभिजीत बिचुकलेंची आई येणार आहे… अभिजीत बिचुकलेंच्या आईचे म्हणणे आहे, “तीन महिने सांभाळायचे, घरातील चार पोर सांभाळायला जमत नाही… तुम्ही सगळी कारटी घरातली, तुमच्यामुळे बिग बॉसना झोप लागत नाही… आणि घरच्यांना हे ऐकून हसू फुटले… कुठेतरी त्यांना देखील हे पटले असावे… अभिजीत बिचुकले आईचे म्हणणे आहे मला सगळे आवडतात… आईला सगळी मूल आवडतात. आईला वेगळी नसतात मूल… बिचुकलेंच्या आईने सगळ्यांना सल्ला दिला… चांगले वागा, आई वडिलांची मूल नाही तुम्ही आता एक महिना बिग बॉसची मूल आहात त्या पध्दतीने वागा…
त्या पुढे सदस्यांशी बोलताना म्हणाल्या, “तुम्ही अल्लड मूल आहात बिग बॉसना किती काळजी आहे तुमची, किती भांडता तुम्ही, त्यांना किती विचार असतील तुमचे… तुम्ही किती तर्हेची माणसं आहत इथे एकत्र… आई वडिलांपेक्षा जास्त त्रास आहे त्यांना तुमचा… बघूया पुढे त्या काय काय म्हणाल्या ? सदस्यांना कोण कोणते सल्ले दिले ? आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.