बिग बॉस मराठीच्या कालच्या भागामध्ये बर्‍याच घटना घडल्या… कालचा भाग खूपच भाऊक करणारा ठरला… काल घरामध्ये शिवची बहीण आणि आई, विणाची आई, अभिजीत केळकरची दोन मूल आणि बायको घरामध्ये येऊन गेले… शिवच्या बहिणीने शिवची कानउघडणी केली आणि त्याला मार्गदर्शन केले, तर आईने शिवलाच खडसावले की सगळ्यांशी चांगले वाग, आमच्याशी भांडुन तू या बिग बॉसच्या घरामध्ये आला आहेस तर विसरू नको तुझे ध्येय काय आहे… तर अभिजीतच्या बायकोने अभिजीतला प्रोत्साहन दिले आणि उत्तम खेळत आहे असे सांगितले… तू जसा आहेस तसाच घरामध्ये वावरतो आहेस ते उत्तम आहे…

तर त्याच्या मुलांनी घरातील एकूणएक सदस्यांना त्यांच्या नावाने ओळखले… आज घरामध्ये आरोहच्या घरातील खास सदस्य त्याला भेटायला येणार आहे… त्याने लिहिलेले पत्र वाचताना त्याला अश्रु अनावर झाले…

असे काय लिहिले होते त्याने त्या पत्रामध्ये जे वाचताना घरातून आलेल्या सदस्यासमोर त्याच्या अश्रुंचा बांध फुटला… जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.