Yashwant International Film Festival concludes




Ending oF Yashwant International Film Festival

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता

२० जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेल्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता काल २६ जानेवारी रोजी बार्बरा एडरच्या ‘थँक यु फॉर बॉम्बिंग’ ने झाली . यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म  फाऊंडेशन , मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगला होता.

 

“पुस्तकांइतकच सिनेमा आपल्याला जगाचं व आयुष्याचं भान देतो”

महोत्सवाच्या उद्घाटनाला पंकज कपूर ह्यांना त्यांच्या सिनेमातील भरीव कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. तेंव्हा त्यांनी हे उदगार काढले.

 

हा उद्घाटन सोहळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार आणि प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि फेस्टिव्हल डिरेक्टर डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत झाला होता. चित्रपट महोत्सवात नाविन्यपूर्ण व दर्जेदार चित्रपटांनी चोखंदळ आणि रसिक प्रेक्षक तृप्त झाला. महोत्सवासाठीच्या चित्रपट निवडीमधील नाविन्य, प्रगल्भता व श्रुजानशीलतेबद्दल चित्रपट महोत्सव प्रतिनिधी खूपच समाधानी होते. डॉटर या इराणी चित्रपटाने महोत्सवाची सुरवात झाली. महोत्सवात  वेगवेगळ्या भाषेतील एकूण ७५ चित्रपट दाखवले गेले.   जागतिक सिनेमा विभागातील, पर्सनल शॉपर, ग्रेज्यूएशन, न्यूज फ्रॉम प्लेनेट मार्स, डर्टी येलो डार्कनेस, द स्टुडट, डीसेंट वूमन, एक्स ५००, ग्लोरी, सिनेमा नोव्हो या काही चित्रपटांना खास पसंती दर्शवली. खास प्रदर्शन विभागातील क्लासिक चित्रपटांनी जुन्या आणि नवीन प्रेक्षांकांना पुन्हा एकदा आकर्षित केलं. त्या विभागात आंद्रे वायदाचा Ashes and Diamond गीगी रोकॅटीचा Babylon Sistersआणि अब्बास किरिओस्तामीचा क्लोजप हे सिनेमे दाखवले गेले. गुड पिपल, डोंकी असे लाटिन अमेरिकन चित्रपटही खूप आवडीने पाहिले गेले. इष्टी हा संस्कृत भाषेतील चित्रपट ही  दाखवण्यात आला. तर ‘लेथ जोशी, एक ते चार बंद व घुमा ह्या चित्रपटांना महोत्सवाच्या प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यावेळी चित्रपटातील दिग्दर्शक, तंत्रज्ञ व कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

चिली देशातील संगीत दिग्दर्शक गॉर्जे ऍरिगडा यांचा मास्टर क्लास ‘म्युझिक ऍन्ड साऊंड इन सिनेमा’ या विषयावर २1 जानेवारी सायंकाळी झाला. चित्रपटांतील पार्श्वसंगीताबद्दल तब्बल २ तास त्यांनी प्रात्यक्षिकांसह विवेचनानी जमलेल्या चित्रपट प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केलं.

यावर्षीच्या`स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे  व्याख्याते म्हणून लाभले होते. हिंदीचित्रपटातील साचेबद्ध स्त्री भूमिका व आपल्या अभिनयाने तो साचा तोडायला भाग पाडणाऱ्या स्मिता पाटील या संवदनशील कलाकाराबद्दल ते खूप मार्मिक बोलले. त्यांनतरच्या प्रश्नोत्तरांच्या डॉ जब्बार पटेल यांनी त्यांना काही पेचात टाकणारे प्रश्नही विचारले. त्यात गोवारीकरांनी हे कबूल केलं की त्यांना ऑस्करपेक्षा कान्स जास्त महत्वाचं वाटतं.

पुण्याच्या National Film Archive यांचे आझादी सत्तर ह्या विषयावरचे चित्रपट पोस्टर प्रदर्शन महोत्सवाचे खास आकर्षण ठरले होते.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी माननीय श्री. शरद पवार यांना घोषित झालेल्या पद्मविभूषण ह्या पुरस्काराबद्दल त्याचं अभिनंदन केलं गेलं. महोत्सवाचे  मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी  आपल्या आभारप्रदर्शनात महोत्सव यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा हातभार होता त्यासर्वाचा व चित्रपट रसिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादबद्दल सगळ्यांचे आभार मानले. या महोत्सवात आम्ही नेहमीच जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट रसिकांसाठी आणत राहू याची ग्वाही दिली. तर पुढच्यावर्षी हा महोत्सव १९ जानेवारी ते २५ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. असे प्रतिपादन यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here