Taleem Marathi Movie Review

 

  • Review : Taleem (2016) | तालीम
  • Producor : Sudarshan Ingale, Sanjay Mulay, Jayaditya Giri, Nitin Madhukar Rokade
  • StarCast : Abhijeet Shwetchandra, Vaishali Dabhade, Mitali Jagtap, Vishnu Joshilkar, Prashant Mohite, Yashpal Sarnath, Arjun, Chaya Kadam
  • Director : Nitin Madhukar Rokade
  • Production House : K

Taleem Marathi Movie Review

Taleem Marathi Movie Song Free Download

तालिम या चित्रपटातून क्रिडा क्षेत्रावर आधारित चित्रपट मराठी सिनेसृष्टीत ब-याचदा पाहता येतात असं नाही. पण काही चित्रपट असे आहेत ज्यातून क्रिडाविषयी माहिती देण्यात येते. त्यापैकी तालिम हा एक मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

तालिम या चित्रपटातून कुस्ती या खेळावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. कुस्तीविषयी सर्वांना माहितचं आहे पण चित्रपटाच्या माध्यमातून कुस्ती हा खेळ आणि कुस्तीपटू यांच्या बाजूने चित्रपटात गोष्टी मांडण्यात आल्या आहेत.

Taleem Marathi Movie Song Free Download

रांजणी गावातील १९७४ सालची ही गोष्ट आहे. पहलवानीवर आधारित या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र याच्यामध्ये आणि शेजारील गावातील एका पहिलवानांमध्ये कुस्तीचा खेळ रंगतो. त्यामध्ये अभिजीतला यश मिळतं. पहलवानीमध्ये निपुण असलेल्या अभिजीतला पहलवानीसाठी आईकडूव परवानगी नसते पण वडीलांचा पूर्ण पाठिंबा असतो.  पहलवानी शिकायचं धाडस अंगी बाळगून त्याचे पूर्ण शिक्षण अभिजीत घेतो.

अभिजीत कुस्तीचा पहिला डाव जिंकतो मात्र दुसरा डाव हरतो.  कुस्तीचा पहिला डाव जिंकल्यावर गावातील सरपंच लावणीचा बेत ठरवतात. त्यावेळी वैशाली दाभाडे आणि अभिजीत समोरासमोर येतात.

या प्रसंगानंतर त्यांच्यातील केमिस्ट्री जुळून येते.  खरी परिक्षा तेव्हा सुरु होते जेव्हा समोरील पहिलवान अभिजीतला कोण कुस्तीचा डाव जिंकतो बघू असं आव्हान करतो. समोरील पहिलवानाने दिलेलं आव्हान अभिजीत पेलू शकेल का, स्वत:च्या गावाचं नाव अभिजीत मोठं करु शकेल का? कुस्ती हा खेळ आणि पहलवान आणि लावणी सादर करणारी नृत्यांगणा यांच्यातील प्रेमकथा यांची सुंदर सांगड म्हणजे तालीम हा चित्रपट.

Taleem Marathi Movie Still Photos

Taleem Marathi Movie Song Free Download

कुस्ती खेळावर आधारित या चित्रपटात खरोखरची कुस्ती दाखवण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे हे दिसून येते. कुस्ती खेळात जाण आणण्यासाठी खरोखरच्या कुस्तीपटूंनी या चित्रपटात अभिनय केला आहे.

कुस्तीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटावर लोककला असलेले लावणी नृत्य देखील सुंदररित्या चित्रित करण्यात आलेले आहे.  अभिजीत श्वेतचंद्र आणि वैशाली दाभाडे यांची केमिस्ट्री जुळून आली आहे.

या चित्रपटामुळे कुस्ती या खेळाविषयी विविध अंगांच्या बाजूने विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. मोठ्या पडद्यावर कुस्तीची तालिम पाहण्यासाठी तालिम हा चित्रपट नक्की पाहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here