हिंदी चित्रपट व मालिका सृष्टीतील एका जेष्ठ अभिनेत्याचं नि’ध’न झालं आहे. त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरलेली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दिसलेले सर्वांचे नट्टू काका आता आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाहीत. कारण ते या जगातून आपल्याला कायमचं सोडून गेलेले आहेत. आज नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे नि’ध’न झाले आहे.
ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना कॅ’न्स’र झालेला होता. शोचे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती ट्विटर शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की नट्टू काका बऱ्याच दिवसांपासून आ’जा’री होते आणि त्यांना क’र्क’रो’ग होता. ते तारक मेहता का उल्टा चश्माशी अगदी सुरुवातीपासूनच जोडलेले होते. त्यांच्या सारखे अभिनेते ज्यांनी खूप प्रामाणिक पणे या काळात काम केलं. ते आता इथून पुढे दिसणार नाहीत.
नट्टू काकांनी आपल्या विनोदाने सर्वांना खूप हसवले. शोमध्ये ते जेठालालच्या सहाय्यकाची भूमिका करायचे. तसेच ते शो मध्ये दुकानात काम करायचे. ते त्यांच्या मजेदार अभिव्यक्तींनी , विनोदाने सर्वांना हसवायचे. सर्व पात्रांसोबत त्यांचे संबंधही खूप खास होते. महत्वाचे होते. प्रेमळ, विनोदी होते. या तारक मेहता टिव्ही सिरीयल शो मध्ये, प्रत्येकजण त्यांच्या गोंडस स्मित आणि इंग्रजी बोलण्याच्या उच्चारणाने वेडे होते.
त्यांचे घराघरांत चाहते होते. कारण त्यांचं काम खूप भारी होतं. पण या जगात जन्म म्हंटलं की मृ’त्यू ही आलाच. त्यांना त्यांचे चाहते सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली देत आहेत.
वयाच्या 77 व्या वर्षी नि’ध’न झाले.. घनश्याम नायक यांचा जन्म 12 मे 1944 रोजी झाला होता. ते 77 वर्षांचे झाले होते. ते बराच काळ आ’जा’री होते. क’र्क’रो’गा’शी ल’ढा देत होते. तारक मेहताची टीम अभिनेत्याच्या निधनाने अ’त्यं’त दु: खी आहे.
शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचा फोटो शेअर करताना लिहिले – आमचे प्रिय नट्टू काका @TMKOC_NTF आता आमच्यात नाहीत.परम दयाळू देव चरणी काकांना स्थान देऊ. त्यांच्या कुटुंबातील सर्वांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देऊ. भावपूर्ण श्रद्धांजली #nattukaka. अनेक चित्रपटांचा भाग असलेले अभिनेते नट्टू काका. घनश्याम नायक यांनी केवळ टीव्हीमध्येच नव्हे तर चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. आपली छाप सोडलेली आहे.
अशोक कुमार यांच्या ‘मासूम’ चित्रपटात ते बालकलाकार म्हणून दिसले. यानंतर ते तिरंगा, आँखे, लाडला, क्रांतिवीर, आंदोलन, बरसात, माफिया, चाहत, इश्क, चायना गेट, तेरे नाम आणि खाकी यासह अनेक चित्रपटांचा भाग होते. मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ती भरून निघणे अवघड आहे.