मित्रांनो!, तुम्हाला आठवत असेलच की, आपल्या बेबी बंपच्या फोटोंवरून सोशल मीडियावर उर्मिला ट्रोल झाली होती. त्यावर तिने सडेतोड उत्तरदेखील दिले होते. मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली. होय, अभिनेत्री आणि युट्यूबर असलेली उर्मिला निंबाळकर एका गोंडस बाळाची आई झाली आहे.
उर्मिलाने एका मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच हा आनंद उर्मिलाने शेअर केला आहे. तिच्या हटके पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला आहे. शुक्रवारीच उर्मिलाने आपल्या डोहाळ जेवणाचा फोटो शेअर केला आहे.
वडिलांवर, भावावर Vaibhav Nimbalkar, दिरावर, सासऱ्यावर आणि सगळ्यांत जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर Sukirt Gumaste अति प्रेम असलं की, रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरो ची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात 3 ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय, अशी सुंदर पोस्ट उर्मिलाने लिहिली आहे. #blessedwithbabyboy #Babyboy #newmomlife असे तीन हॅशटॅग वापरत तिने पोस्ट शेअर केलीय.
3 ऑगस्ट रोजी उर्मिलाने बाळाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी उर्मिलाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 3 ऑगस्ट रोजीच सकाळी सात वाजता उर्मिलाने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने ‘कोणत्याही क्षणी..आनंद, परमानंद, गोविंद’ अशी पोस्ट लिहून फोटो शेअर केला होता. ही तिच्या बाळाच्या आगमनाची हिंट तर नव्हती ना… अशी चर्चा रंगली आहे. ही सारखीच पोस्ट सुकिर्तने देखील शेअर केली होती.
उर्मिलाने आपले हे नऊ महिने अतिशय आनंदात साजरे केले. तिच्या ब्लॉगवरून हे आपल्याला पाहायला मिळालं. अनेकदा तिला यावरून ट्रोलही करण्यात आलं मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष करत आपला आनंद साजरा केला. उर्मिलाच्या या पोस्टनंतर तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
स्वप्निल जोशी, जुई गडकरी अशा अनेक कलाकारांनीही उर्मिलाला शुभेच्छा दिल्या आहेत.मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरने काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर तिने आपल्या बेबी बंपचा फोटो शेयर केला होता.यानंतर डोहाळे जेवणाचे फोटोही तिने शेअर केले होते. प्रेग्नेन्सीच्या नऊ महिन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद तिने घेतला आणि अखेर ती ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत होती, तो क्षणही आला.
उर्मिला निंबाळकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून विविध मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दिया और बाती, मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत तिने काम केले आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावरील दुहेरी ही मालिका चांगलीच गाजली होती. उर्मिलाने पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फॅशन डिझायनरचे शिक्षण घेतले. तिने एक तारा, हायवे आणि सनई चौघडे यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे.