सुपरस्टार धर्मेंद्र : अलीकडेच हेमा मालिनीने तिच्या एका मुलाखतीत याबद्दल बोलले आहे. हेमा मालिनी ने सांगितले होते की, धर्मेंद्र गेल्या एका वर्षीपासून कोरोना विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी फार्महाऊसवर राहत आहे. ना तो बाहेर पडतो ना कोणी त्याला भेटायला जात. हेमा मालिनी म्हणाली की, “त्याच्या (धर्मेंद्र) सुरक्षेसाठी देखील हे आवश्यक आहे.” आत्ता, एकत्र वेळ घालवण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरोगी असणे आणि आम्ही त्याकडेच लक्ष देत आहोत.

”ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र चे फार्महाऊस मुंबईजवळील लोणावळ्यात आहे. त्याच्या फार्महाऊसमध्ये आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट उपस्थित आहे. त्याचे हे फार्महाऊस दिसायला खूप सुंदर आहे. मिळालेल्या माहितीनुसार धरम जी ने या फार्म हाऊसमध्ये एक आलिशान बंगला देखील बांधला आहे. त्याचवेळी अभिनेत्याने फार्महाऊसमध्ये रॉक गार्डन देखील बनवले आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असतो.

वेळोवेळी तो त्याच्या चाहत्यांसाठी त्याचे फोटो आणि व्हिडिओ सामायिक करत असतो. असे म्हणतात की धर्मेंद्र हा फार्महाऊसवर सेंद्रिय शेती देखील करतो. त्याच्या फार्महाऊसमध्ये म्हशी आणि गायीही आहेत. धर्मेंद्रच्या या फार्महाऊसमध्ये अनेक कामगार काम करतात. धर्मेंद्र ने आपल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, “मी एक जाट आहे आणि जाटांना त्यांच्या जमीनवर खूप प्रेम आहे.” माझा बहुतांश वेळ लोणावळा येथील माझ्या फार्महाऊसवरच मी घालवितो.”

सुपरस्टार जुही चावला : जुही सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. परंतु, जुही सोशल मीडियावर सक्रिय असते. जुही फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच संवाद साधत असते. नुकतेच जुहीने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यात ती चक्क एका आमराईत बसलेली दिसत आहे. जुहीच्या पुढ्यात तर आंब्यांची रास लागलेली आहे. सध्या जुही तिच्या वडिलांच्या जमिनीवर आमराई उभारण्यात व्यग्र आहे.

जुहीने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एवढ्या मोठ्या अभिनेत्रीला आमराईत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. सध्या जुही तिच्या फार्महाउसवर आहे. तिच्या समोर टेबलावर आंब्यांची भलीमोठी रास लागली आहे. विशेष म्हणजे हे जुहीचं नवीन ऑफिस आहे. तर दुसऱ्या फोटोत ती काही व्यक्तींसोबत बोलत आहे. या फोटोसोबत जुहीने लिहिलं, ‘वाडा फार्मवर माझं नवीन ऑफिस. पूर्णपणे हवेशीर आणि ऑक्सिजनने भरलेलं.

सोबतच नवीन गो शाळा, स्टाफसाठी घर आणि आणखी फळ असणारी झाडं लावण्याचा विचार करतोय.’ खरं तर ही जागा जुहीच्या वडिलांनी घेतली होती. एका मुलाखतीत जुहीने याबद्दल सांगताना म्हटलं होतं की, ‘माझ्या शेतकरी वडिलांनी वाडा येथे २० एकर जागा घेतली होती. जेव्हा त्यांनी शेती करण्यायोग्य असलेल्या जमिनीत पैसे गुंतवले तेव्हा मी चित्रपटांमध्ये व्यग्र होती आणि माझ्याकडे जमिनीकडे लक्ष देण्याचा वेळ नव्हता.

पण त्यांच्या निधनानंतर मी या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.’ जुहीने १९९७ साली जय मेहतांसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. जुहीला अर्जुन आणि जान्हवी अशी दोन मुलं आहेत. जुही शेवटची ‘द टेस्ट केस’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती.

‘सिया के राम’ फेम अभिनेता आशीष शर्मा : ‘सिया के राम’ या मालिकेत प्रभु रामाची भूमिका साकारणारा अभिनेता आशीष शर्मा या मालिकेनंतर तुफान लोकप्रिय झाला. सध्या हा अभिनेता कुठे आहे? तर टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आपल्या राजस्थानातील गावी. होय, अ‍ॅक्टिंग सोडून आशीषने आता शेती करायचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊनदरम्यान आशीषने शेती करण्याचा निर्णय घेतला. आता मी पूर्णपणे शेतीत रमलोय, असे त्याने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कोरोना महामारी काळात मी शेतीत पेरणी केली, गाईचे दूध काढणे, ट्रॅक्टर चालवणेही शिकलो, असे तो म्हणाला. आयुष्यातला खरा आनंद आपण विसरत चाललो आहोत. पण या महामारीने आपल्याला खूप काही शिकवले. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देतात, असे तो म्हणाला. मी पुन्हा शेतकरी बनण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आल्यानंतर मी शेतीकडे दुर्लक्ष केले होते.

पण आता मी पुन्हा माझ्या गावाला परतलो आहे, असे त्याने सांगितले. गावात आमची 40 एकर जमीन आहे. 40 गाई आहेत. पौष्टिक आहार पद्धतीला प्रोत्साहन देणे आमचे ध्येय आहे. मी आता याच दिशेने काम करू इच्छितो, असेही त्याने स्पष्ट केले. सिया के राम या मालिकेत आशीषने रामाची भूमिका साकारली होती. रंगरसिया या मालिकेतही तो झळकला होता.