मित्रांनो!,अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत बालकलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.
पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. कारण त्यानंतर अनेक कलाकारांचा टिव्ही सोबत फारसा संबंध नाही राहिला. अनेकांनी आपल्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले. किंवा मग वयोमानाने चेहरे बदलल्याने ते आपल्या विस्मरणात गेले. तर चला आपण आज जाणून घेऊयात अशाच एका बाल-कलाकाराबद्दल..
काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजन वर ‘छोटे मियाँ’ नावाचा एक शो आला होता, त्यातील एक पात्र भलतंच गाजलं ते म्हणजे ‘गंगुबाई’. आपल्या सर्वांचं लाडकं गंगुबाई हे पात्र साकारलं होत छोट्याश्या ‘सलोनी’ ने तेव्हा सलोनी ही खूपच गोङ दिसत होती. तिच्या गुबगुबीत सौंदर्यानं ती खरीखुरी गंगूबाईच दिसत होती. तिचं ते अल्लड हसणं, खिदळणं तिच्या चाहत्या बालकलाकारांना आजही आठवतं.
नऊवारी साडी, हातभर चुडा आणि कपाळावर कुंकू असा हा या लहानग्या गंगूचा वेश होता.पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपली लहानशी ही गंगूबाई आता बरीच मोठी झाली आहे. इतकचं नव्हे, तर तिचं आताचं रूप पाहून तुम्हांला देखील विश्वास बसणार नाही. काही वर्षांपूर्वी जाडजूड असलेल्या या गंगूचं एका सुंदर तरुणीत परिवर्तन झाले आहे, आणि तिचं हे देखणं रूप पाहून तुम्ही पण चकित व्हाल.
मनोरंजन क्षेत्रात अजूनही गंगुबाई याच नावाने प्रसिद्ध असलेली बालकलाकार सलोनी दैनी आता खूपच बदलली आहे.नुकताच तिने तिचा २१ वा वाढदिवस साजरा केला असून तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहे. सलोनीने गेल्या १४ महिन्यात २२ किलो वजन कमी केले असून ती प्रचंड स्लीम अँड ट्रीम दिसत आहे. लोक मला माझ्या शरीरावरुन नेहमीच चिडवायचे. एवढेच नव्हे तर मला हत्तीचं पिल्लू देखील म्हणायचे.
माझ्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत मी थोडी जाड होते. शिवाय माझी उंची देखील खूप कमी होती. त्यामुळे कॉमेडी करत असताना माझ्या शरीरावरून अनेकवेळा विनोद केले जात होते. मी ते ऐकून कॅमेऱ्यासमोर हसत असली तरी आतून मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला असे तिने नुकत्याच टेलिचक्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
सलोनीने व्यायाम आणि डाएट यांच्या मदतीने जवळजवळ २२ किलो वजन केवळ १४ महिन्यात कमी केले आहे. सलोनीने २००८ साली ‘छोटे मिया’ या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही व्यक्तिरेका त्यावेळी तुफान गाजली होती. आजही तिला गंगूबाई म्हणूनच ओळखले जाते.
त्यानंतर तिने ‘रावी’, ‘नमुने’, ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘तेडी मेढी फॅमेली’, यह जादू है जिन्न का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.सलोनी प्रचंड ग्लॅमरस झाली असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सलोनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो पाहून तिच्यावर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.