मित्रांनो! आपण जाणताच की, सध्या बॉलीवूड अभिनेता आमिर खान हा चांगलाच चर्चेत आहे. आपल्या दुसऱ्या लग्नाच्या तब्बल 15 वर्षानंतर अभिनेता आमिर खान आणि निर्माती व दिग्दर्शक किरण राव हिने एकमेकांपासून विभक्त होण्याचा शनिवारी (दि.3 जुलै) निर्णय घेतला. त्यानंतर आमिरनी स्वतः या विषयी त्याच्या चाहत्यांना माहिती दिली.
मात्र घटस्फोटानंतर सध्या आमिरच्या अनेक विषयांवर चर्चा होत आहे.एकीकडे अनेक युजर आमिरला ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे अनेकांना आमिरच्या पहिल्या पत्नीबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांना माहित आहे की, आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची झलक ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती.
तेव्हापासून आतापर्यंत रीनाच्या लूकमध्ये बराच फरक पडला आहे. विशेष म्हणजे ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच आमिर आणि रीनाचे लग्न झाले होते. जोपर्यंत चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत लग्नाची गोष्ट लपवून ठेवण्याची गळ निर्मात्यांनी आमिरला घातली होती. पण आमिर ही अट मानायला तयार नव्हता.
चित्रपटाच्या एका गाण्यात रीनाचा एक सीन शूट केला गेला, तेव्हा कुठे आमिर मानला. स्टारडमच्या आधीच रीना दत्तला आपली साथीदार म्हणून निवडल्यानंतर 16 वर्षांनी या दोघांनी आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर त्याने लगेच दिग्दर्शक व निर्माती किरण राव हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय आमिरने घेतला.
मात्र नुकतंच आमीरने किरण राव सोबतचाही आपला 15 वर्षांचा संसार मोडला आहे. त्यामुळे त्याची पहिली पत्नी रिना दत्त ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रीना सध्या काय करते, ती कशी दिसते? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. मीडिया सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमीर खानसोबत घटस्फोट घेतल्यावर रीना दत्त ही नोकरी करत आहे.
त्याचप्रमाणे ती आपल्या दोन्ही मुलांचा अतिशय उत्कृष्टपणे सांभाळ करत आहे. घटस्फोटानंतर देखील रीना व आमीर खान यांचे एकमेकांसोबत चांगले संबंध राहिले आहेत. हे दोघेही एकमेकांच्या आनंदाच्या व दुःखाच्या प्रसंगी एकमेकांची साथ निभावतात. आमीर खानची दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत सुद्धा रिना दत्तचे मैत्रीचे संबंध होते. शेवटी रिना दत्त हिला 2019 मध्ये पाहण्यात आले होते.
तेव्हा ती तिचा वाढदिवस साजरा करताना दिसली होती. त्यावेळी आमीर खान व किरण राव हे दोघेपण तेथे उपस्थित होते. परंतु त्यानंतर रीना दत्त ही पुन्हा पाहण्यात आलीच नाही. एवढंच नव्हे मागील 5 वर्षांपासून तिचा एक फोटो सुद्धा सोशल मीडियावर दिसला नाही. तसेच मुलगा जुनैद आणि मूलगी आयरा हिने सुद्धा आपली आई रीनाचा एक सुद्धा फोटो शेयर केलेला नाही.