मित्रांनो!, झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतील गुरुनाथ सुभेदार उर्फ गॅरी फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर हा तुमच्या चांगलाच स्मरणात असेल. त्याच्या वास्तववादी अभिनयाने जसा तो रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहतो तशाच प्रकारे तो आता त्याच्या अतरंगी लुकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तर अशा या मराठीतला ‘रणवीर सिंग’ म्हणून नवीनच ओळख प्राप्त झालेल्या अभिजीत खांडकेकरचा अतरंगी लुक बघाच.

अगदी काहीच दिवसांपूर्वी अभिजीतने पारंपरिक साडीपासून तयार केलेला पोशाख परिधान करत एक लांबलचक पोस्ट टाकली होतीच की, मराठी चित्रपटसृष्टीतील तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर Abhijeet Khandkekar सध्या जाम चर्चेत आहे. होय, त्याच्या हटके लुकची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगलीये.

अभिजीतचा हा लुक पाहून त्याच्या चाहत्यांना आणि काही मराठी रसिक प्रेक्षकांना हटकून रणवीर सिंगची आठवण होतेय. रणवीर सिंग हा सुद्धा त्याच्या अशाच चित्रविचित्र फॅशन व कपड्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याची यावरून खिल्लीही उडवली जाते. पण जगाची पर्वा करतंय कोण? आता हाच अ‍ॅटिट्यूड अभिजीत खांडकेकरने दाखवला आहे. त्याने एक झक्कास लुक शेअर केला आहे.

या फोटोत अभिजीतने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या प्लाजोला मिळतीजुळती पॅन्ट परिधान केली आहे. अनेकांना अभिजीतचा हा लुक जाम आवडला आहे. पण अनेक नेटक-यांनी यावरून अभिजीतची मजा घेतली आहे. शिवाय त्याची तुलना चक्क रणवीर सिंगशी केली आहे. अजून एक नमुना, मराठीतला रणवीर सिंग अशा कमेंट्स युजर्सनी दिल्या आहेत.

एका युजरने ‘झगा, मगा सर्वांनी मला बघा,’ अशी मजेशीर कमेंट लिहिली आहे. एका युजरने चक्क रणवीरसारखा अतरंंगी होऊ नकोस, नाहीतर पोरी तुझ्याकडे बघण थांबवतील, असा सल्ला दिला आहे. एका युजरने रणवीर सिंग अंगात घुसलाय का? अशा शब्दांत अभिजीतची खिल्ली उडवली आहे.

एकंदर काय तर ‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर त्याच्या अतरंगी लुकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिजीतने पारंपरिक साडीपासून तयार केलेला पोशाख परिधान करत एक नवीनच विचार करायला लावणारी पोस्ट टाकली होती. आणखी वरून स्त्री आणि पुरुषांचे कपडे विभागू नयेत असे मतही व्यक्त केले होते.