मित्रांनो!, सध्या “अग्गबाई सूनबाई” ही लोकप्रिय मालिकेचे कथानक अतिशय वेगाने पुढे सरकत अतिशय रंजक वळणावर आल्याचे आपल्याला दिसत आहे. या बहुचर्चित मालिकेत अनुराग गोखले नावाच्या इंटरेस्टिंग पात्राने एन्ट्री घेतलेली आहे. आणि ही भूमिका साकारतोय चिन्मय उदगीरकर हा लोकप्रिय अभिनेता.

चिन्मय हा आजवर त्याच्या जबरदस्त लूक्समुळे आणि वास्तववादी कामामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलाय. या आधीसुद्धा घाडगे अँड सून किंवा नांदा सौख्यभरे या मालिकांमधून चिन्मयने उत्तम भूमिका साकारून आपल्या चाहत्यांना खूश केलेले आहेच. “अग्गबाई सूनबाई” या मालिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचं श्रवणीय शिर्षकगीत आणि अशोक सराफ यांच्या पत्नी निविदिता सराफ, डॉ. गिरीश ओक, मोहन जोशी यांसारख्या दिग्गजांचा अभिनय.

 

या मालिकेची चर्चा चाहत्यांमधे हमखास होतांना दिसून येते. अशा मालिकेत सध्या अद्वैत दादरकर सोबत चिन्मयची जुगलबंदी रंगतांना दिसतेय. यातही महत्त्वाची बाब म्हणजे चिन्मयांच्या लेडी फॅन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, आणि बऱ्याच जणींना चिन्मयचे नेमके रिलेशनशिप स्टेटस जाणून घ्यायचेय. त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की चिन्मयचे लग्न गिरिजा जोशी हिच्यासोबत झाले आहे. ते लव्ह मॅरेज आहे.

चला तर मग जाणून घेऊयात,चिन्मयच्या लव्ह स्टोरी विषयी. चिन्मय हा कॉलेज मधे असल्यापासून अनेक एकांकीका आणि स्पर्धांमधे अभिनय करायचा. त्यामुळे त्याच्यावर तेंव्हापासूनच अनेक मुली फिदा होत्या. याच दरम्यान त्याची ओळख गिरीजा जोशी हीच्याशी झाली होती. दोघेही कलाकार असल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी सहज जुळून आल्या.

 

 

ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोघांनी अनेक चित्रपटांमधे एकत्र कामही केले. साहजिकच त्यांचे नातेसंबंध अधिकाधिक घट्ट होत गेले आणि त्यांनी एकमेकांसोबत लग्नंगाठ बांधली. गिरीजा जोशी ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चिन्मयचा आवाज आणि त्याचा पडद्यावरील सहज वावर ही त्याच्या अभिनयाची जमेची बाजू. चिन्मय नेहमीच कथेनुसार आपल्या अभिनयात बदल करून अप्रतिमरित्या भूमिका साकारतो.

चिन्मयने फक्त मालिकाच नाही तर अनेक चित्रपटांमधेही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो “शेजारी शेजारी सख्खे शेजारी” या मालिकेचं सुत्रसंचालनही करताना दिसून येतो. चिन्मयचा सिनेसृष्टीतील हा प्रवास असाच सुरू राहिल यात तीळमात्रही शंका नाही. नुकत्याच रिलिज झालेल्या मेक अप या चित्रपटातही चिन्मयने सुंदर भूमिका साकारली आहे.