अभिनेता प्रभास या वर्षी बराचकाळ चर्चेत राहताना आपल्याला पहायला मिळतो आहे. प्रभाससाठी हे वर्ष साहजिकचं सिनेमा पडद्यावरील खास वर्ष पार पडत असल्याचं सध्यातरी दिसत आहे. सध्या आपल्या “राधे शाम” या सिनेमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणाऱ्या प्रभासचा एक आणखी महत्वाच्या अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरलं होत असल्याचं पहायला मिळतं आहे.
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आणि चर्चेचा विषय ठरू लागला आहे. या फोटोमधे प्रभाससोबत जी अभिनेत्री आहे ती दुसरीतिसरी कोणी नसून थेट क्रिती सेनन आहे. क्रितीचा हा फोटो प्रभाससोबत नेमक्या ज्या कारणास्तव आहे, ते कारण म्हणजे “आदीपुरूष” हा नवा प्रोजेक्ट. या सिनेमात अभिनेता सनी सिंग, प्रभास आणि क्रिती सेनन एकत्र दिसणार असून हा सिनेमा राम, लक्ष्मण, सिता यांचे चित्र सध्या दर्शवत असल्याचं पहायला मिळतं आहे. तिघांचाही हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालतो आहे. आदिपुरुष या मोठ्या सिनेमाचं दिग्दर्शन “ओम राऊत” हा मराठी दिग्दर्शक करणार आहे.
ओम राऊतच्या दिग्दर्शनाचा एक अतिउत्कृष्ट नमुना सर्व रसिकप्रेक्षकांच्या नजरेस “तान्हाजी” सिनेमातून आलाच आहे. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर लाखो चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालेला पहायला मिळतो आहे.
शिवाय अनेकांची क्रिती आणि प्रभास यांची पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यास उत्सुकता पणाला लागलेली आहे. क्रितीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ती विविध साच्यातील भुमिका हाताळण्यात आजलर चांगली सफल राहिलेली आहे. इथून पुढे तिच्या वाट्याला आलेल्या भुमिकांबाबत ती काय करेल? हे पाहणं अगदीच उत्सहाचं ठरेल.
अभिनेता प्रभास याने ही पोस्ट शेअर करताना असं लिहलं आहे की, “आदिपुरुष या प्रोजेक्टसाठी क्रिती आणि सनीचं या परीवारात स्वागत आहे.” अभिनेता सनी सिंग चक्क या प्रोजेक्टचा भाग झाला आहे यामुळे त्याचे चाहते प्रचंड आनंदात असल्याचेही पहायला मिळत आहेत. मुळात सनीच्या अभिनय कौशल्याची दखल आजवर समस्त सिनेसृष्टीने घेतलेलीच आहे.
सनी सिंग नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या हेतुने बऱ्याच गोष्टी करत असल्याचं आजवर पाहण्यात आलं आहे. मुळात आदिपुरुष या सिनेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा सिनेमा ८ ऑगस्ट रोजी याच वर्षी प्रेक्षागृहात पहायला मिळण्याची शक्यता आहे. आदिपुरुष या सिनेमाची व्याप्ती चांगलीच मोठी असल्याने हा सिनेमा तब्बल ५ भाषांमधे अर्थातचं तेलुगु, कन्नड, तमीळ, मल्याळम सोबतचं हिंदी भाषेत रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आदिपुरुष सिनेमाची याआधीच चर्चा खरी रंगली होती ती एका कारणाने, कारण या सिनेमात लंकाधिपती रावण ही भुमिका चक्क “सैफ अली खान” साकारत आहे.
सैफने तान्हाजी सिनेमात साकारलेली नकारात्मक भुमिका त्याच्या कारकिर्दीत एक दैदीप्यमान गोष्ट समजल्या गेली आहे. सैफने आजवर हर एक प्रकारच्या भुमिका बजावल्या आहेत. दुसरीकडे अनेकांना या सिनेमातून दिसणाऱ्या क्रितीकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. क्रिती आणि प्रभास कशा पद्धतीने आपल्या भुमिका साकारतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.
क्रितीचे याआधीचे सिनेमे वेगळ्या धाटणीतले असल्याने तिच्यावर सर्वस्वी एक वेगळीच जिम्मेदारी यावेळी पडलेली पहायला मिळतं आहे. क्रिती ज्या प्रकारे पानीपतमधून तिच्या भुमिकेस योग्यरित्या उतरली त्याचप्रमाणे तिच्याकडून आदिपुरुष मधेही चांगल्या पद्धतीचं काम व्हावं याच सदिच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!