आमिर खान म्हटलं की, बॉलीवुडमधला एकप्रकारचा मिस्टर परफेक्शनिस्ट हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्याने त्याची ही प्रतिमा मिळवली ती त्याच्या अभिनयातील भुमिकांच्या विविधतेतून त्याने दिलेल्या कलाकृतीच्या एकापेक्षा एक भन्नाट अशा चित्रपटांमधून. आमिर एखाद्या भुमिकेबाबत जेव्हा काही अनुभव घ्यायला लागतो तेव्हा तो स्वत:ला त्या साच्यात पुर्णपणे झोकून देत असल्याचं आपण आजवर पाहिलं आहे.

मुळात या सर्व गोष्टी तर आहेतच याशिवाय त्याने गेल्या काही वर्षांमधे भारतात जे काही बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांची एकप्रकारे प्रशंसाच करावी लागेल. सत्यमेव जयते आणि त्यानंतर त्याच टिमसोबत पाणी फाऊंडेशन यांनी मिळून देशाला एक वेगळी उत्कृष्ट दिशा देण्याच काम केलेलं आपण सर्वांनीच आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला आमिर खान हा एक अभिनेता कमी आणि साधा, जवळचा, आपल्यातलाच एक माणूस अशा काहिशा आशयात परिचयास आला. अर्थात तो आहेच तितका प्रांजळ. आमिरच्या बऱ्याच गोष्टी त्याच्या चाहत्यांना आवडत राहिल्या आहेत.

विशेषकरून त्याच्या भारतीय शिक्षणव्यवस्थेवर, पालक-विद्यार्थी नात्यांवर व इतर मुद्यांवर आलेल्या सिनेमांनी भारतीय तरूणाईला एक वेगळा पैलू निर्माण करून दिला. सेक्रेट सुपरस्टार, तारे जमीन पर, ३ इडियट्स यांसारख्या सिनेमांनी त्याच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावून सोडलं.

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही परंतु भारतात केवळ ६० कोटींच्या आसपास गल्ला जमावणारा एक ठराविक विषयावर परखडपणे मत मांडणाऱ्या या सिनेमाने चीनमधे बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडल्याचे पहायला मिळाले. मुळात या सिनेमात आमिर एक वेगळ्याच भुमिकेत आपल्याला पहायला मिळाला होता. तर आमिरच्या सर्वकाही खास बाबी त्याच्या साधेपणावरून दिसून येतात हे आपल्याला समजतंच आहे.

आपण आज आमिरच्या घराबाबत थोडसं जाणून घेणार आहोत. कारण आमिर त्याचा साधेपणा त्याच्या घरातल्या ठेवणीवरूनही कशा प्रकारे जपतो हे आपल्याला निश्चितच यातून पहायला मिळेल. आमिरने त्याच्या घरात आपली पत्नी किरण राव हिच्यासाठी एक सेपरेट साधी बालकनी तयार केलेली आहे.

आमिरच्या घरातलं फर्निचर फारसं डिझाईन केलेलं नसून अगदी सहजरित्या उठावदार दिसणारं आहे. ड्रेसिंगसाठी एक साधा वॉक इन क्लोसेट निर्माण केलेलाही त्याच्या घरात पहायला मिळतो. यासमोरच सर्वसामान्यांच्या घरात असतो तसा ड्रेसिंग टेबल आहे. ज्यावर ब्युटी प्रोडक्ट्स आणि इतर गोष्टी प्रखर्शाने आढळून येतात. एक टापटीप रिकामी फारसा गाजावाजा नसलेली गॅलरी सोबतच मुलाच्या अभ्यासासाठी कलरफुल स्टडी रूम निर्माण केलेली आहे.

आमिरच्या पर्सनल रूममधे अगदीच साधेपणा, भिंतींना अगदी फिकट रंग दिलेला आहे. आमिरच्या घरात सर्वच भिंती अगदी साध्या रंगाने रंगवल्याच्या पहायला मिळतात. आमिर खान आणि किरण राव या दोघांनी आपल घर एका सेलेब्रिटीप्रमाणे आलीशान अजीबातच ठेवलेलं पहायला मिळत नाही.

याऊलट त्याच्या घरात पाऊल ठेवल्यावर हे आमिरचचं घर आहे का? अशा प्रश्न सर्वसामान्यांना व आमिरच्या चाहत्यांना पडेल. आमिर खान आणि किरण राव एकमेकांना आजवर चांगलीच साथ देत राहिल्याचे पहायला मिळाले आहेत. किरण रावबद्दल बोलायचं म्हटलं तर ती सिनेसृष्टीत एका निर्मात्याच्या रूपात पहायला मिळतेचं, शिवाय तिने आजवर काही सिनेमांचं पटकथालेखनदेखील केलेलं आहे. शिवाय ती सिनेसृष्टीत एक दिग्दर्शक म्हणूनही कार्य करताना पहायला मिळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!