“तुझ्यात जीव रंगला” या भन्नाट आणि अस्सल रांगडी मालिकेच्या माध्यामातून अक्षया देवधर आणि सोबतच मालिकेतील इतर कलाकार सर्व तमाम महाराष्ट्राच्या रसिकप्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पहायला मिळाले. त्यात अक्षया देवधरच्या भुमिकेने तर तरूणाईच्या मनावर अक्षरशः गारूडच घातला होता.

नव्याने ही मालिका सुरू झाली होती आणि अक्षयाच्या बाबतीत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड आवड निर्माण झाली होती. अर्थात त्याच कारण म्हणजे तिची भुमिकाच तेवढ्या विशिष्ट धाटणीत बनवल्या गेली होती आणि ती धाटणी हुबेहुब साकारत या मालिकेतील तिच्या पात्राला पुरेपूर न्याय दिला.

अक्षया सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून बरीच सक्रीय राहत असलेली पहायला मिळते आहे. फोटो, व्हिडिओ आणि अनेक इतर बऱ्याच गोष्टी ती आपल्या चाहत्यांसोबत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असते. आता नुकतचं तिने एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि तो प्रचंड व्हायरल होऊन गाजत असल्याच पहायला मिळत आहे.

एकप्रकारे जशी प्रसिद्धी राणादा आणि पाठकबाई यांच्या जोडीला मिळत राहिली आहे तशीच काहीशी प्रसिद्धी तिच्या नव्या व्हिडिओवर मिळताना दिसून येते आहे. तिने आपल्या मैत्रीणींसोबत “दिल चाहता है” या सिनेमातल्या “कोई कहे केहता रहै” या गाण्यावर डान्स केल्याचं पहायला मिळतं आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून आपल्याला अक्षया व तिच्या दोन मैत्रिणी यात भन्नाट डान्स करताना पहायला मिळू शकतात.

शिवाय खासियत म्हणजे, अक्षया देवधरने या व्हिडिओला कॅप्शन जरा हटकेच दिला आहे असं म्हणावं लागेल. या पोस्टवर तिने लिहलं आहे की, “या तो दोस्ती गहरी है… या तो व्हिडिओ 3डी है.” सर्व चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात आवडला आहे. चाहत्यांच्या तिच्या या व्हिडिओवर खुप साऱ्या कमेंट्सचा वर्षाव झाल्याचं पहायला मिळू शकतं. अक्षया देवधरची एकप्रकारे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने “पाठकबाई” हीच ओळख निर्माण केली आहे, असंही म्हटल्या जाऊ शकतं.

“तुझ्यात जीव रंगला” या मालिकेच्या बाबतीत तसं पाहिलं तर राणादा आणि पाठकबाई या जोडीला रसिकप्रेक्षकांनी अगदी मनापासून खुप अधिक प्रेम दिलं आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघे या मालिकेत मुख्य भुमिकेत पहायला मिळाले. अक्षया आणि हार्दिक यांची छोट्या पडद्यावरची ही गाजलेली लव्हस्टोरी नेहमीच सोशल मिडियावरसुद्धा चर्चेत राहिली.

अनेकांच्या चाहत्यांच्या मते अक्षया देवधर आणि हार्दिक ही जोडी त्यांना वारंवार इतर माध्यमातूनही पहायला आवडेल. अक्षया देवधर हिच्या बाबतीत अनेक गोष्टी प्रेक्षकांना तितक्या प्रमाणात प्रखर्शाने माहित नाहीत. तमाम महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेली पाठकबाई, अर्थात अक्षया ही मुळची पुण्यातली आहे.

तिने तिच्या पदवीच शिक्षण हे कॉमर्ससारख्या विषयात पुर्ण करत, सिनेसृष्टीत वाटचाल केली. २०११ मधे आलेल्या शाळा या चित्रपटातील एका भुमिकेतून तिने पदार्पण केलं होतं. अक्षयाने त्याआधी “आयटम” या नाटकातून मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं होतं. या नाटकात तिच्यासोबत अमेय वाघ हा अभिनेता मुख्य भुमिका साकारत होता. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक व्हिडिओ शेअर केल्याचे पहायला मिळतं आहेत.

शिवाय तिच्या अनेक फोटोज आणि व्हिडिओजना चांगला प्रतिसाद हा रसिकप्रेक्षकांमधून मिळताना दिसून येतो. तुझ्यात जीव रंगला या मालिकेने अक्षयाला एक ठाम स्वरूपतली ओळख निर्माण करून दिली आहे, हे निश्चित. तिच्या पाठकबाईंच्या स्वरूपाला हा महाराष्ट्राचा रसिकप्रेक्षक चिरकाळ तरी विसरणार नाही, हे अगदीच खरयं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!