राजपाल यादव या अभिनेत्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुळात त्याच्या सिनेमांमधील विनोदी भुमिकांवर चर्चा करायची झाली तर ती अगदीच खऱ्या अर्थाने प्रशंसनीय राहिलं. कारण राजपाल यादव या अभिनेत्याचं भारतीय सिनेमाक्षेत्रात योगदान फारचं मोलाचं राहिलं आहे. राजपाल यादव याचा नुकताच जन्मदिवस पार पडला. अनेक सेलीब्रेटींनी त्याला या शुभमुहूर्तावर शुभेच्छाही दिल्या आहेत.

राजपाल यादवच्या बाबतीत अनेक गोष्टी फारच सुंदर राहिल्या आहेत. आणि नेहमीच त्याची अभिनयाची कारकिर्द त्याची उंची वाढवणारी ठरली आहे. छोट्या छोट्या भुमिका पडद्यावर साकारणारा राजपाल हळूहळू चांगल्या सहाय्यक भुमिका आणि चांगल्या प्रकारच्या विनोदी भुमिकादेखील मिळवू लागला.

आणि कालांतराने त्याने आपलं साम्राज्यचं जणू निर्माण केलं. राम गोपाल वर्मा यांच्या २००० सालच्या जंगल सिनेमातून राजपालचं रूपेरी मोठ्या पडद्यावरून पदार्पण झालं आणि तिथून पुढे त्याचा सिनेसृष्टीतला प्रवास मार्गी लागायला सुरूवात झाली. राजपाल यादव या अभिनेत्याच्या बाबतीत तुम्ही कदाचित अनभिज्ञ असालं तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या गोष्टीबद्दल काही खास बात सांगणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊयात त्याच्या दुसर्‍या लग्नाची ही गजब कहानी. सिनेसृष्टीतल्या अवघ्या तीन वर्षांच्या कारकीर्दीतचं राजपालचा दुसरा विवाह पार पडला होता. अर्थातचं २००३ साली त्याने दुसऱ्यांदा लग्न केलं. याची गरज त्याला पडली कारण त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं.

पहिल्या पत्नीच्या नि’ध’ना’नंतर राजपाल बराचसा खचला होता. पहिल्या पत्नीच्या मृ’त्यू’नं’तर तब्बल ९ वर्षांनंतर तो दुसर्‍या विवाहबंधनात अ’ड’क’ला. त्याच्या दुसर्‍या पत्नीचं नाव होतं, “राधा.” राधासोबत राजपालची पहिली ओळख, पहिली भेट झाली ती कॅनडामधे. कॅनडात राजपाल त्यावेळी “हिरो” या सिनेमाच्या शुटींगनिमित्त गेलेला होता. शुटींगच्या दरम्यान एका कॉमन मित्राच्या मदतीने दोघांमधे ओळख निर्माण होण्यास मदत झाली होती.

पहिल्या भेटीत कदाचित राधावर राजपालच्या व्यक्तिमत्त्वाची छाप चांगलीच उमटल्याची जाणवत होती. यावेळी राजपाल जेमतेम 10 दिवस कॅनडात असल्या कारणाने दोघांच्याही भेटीला फारसा वेळ मिळाला नव्हता. तरीदेखील दोघांमधे मैत्रीच नातं चांगलच घट्ट निर्माण झालं आणि पुढे ही सहज झालेली ओळख अंतीम टप्यात थेट लग्नावर पोहोचली. 10 जून या दिवसाच्या मुहूर्तावर दोघे लग्नबंधनात अडकले.

मुळात राधा आणि राजपाल दोघेही, राजपालच्या कॅनडावरून मुंबईत परतलेल्या भेटीनंतर चक्क 10 महिने चांगलेच संपर्कात राहिले होते. आणि केवळ दुरध्वनीच्या माध्यमातून हे 10 महिने काढल्यानंतर राधाने राजपालकरता मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. केवळ दोघांना एकमेकांवर झालेल्या प्रेमापोटी राधा बिनधास्त होत मुंबईत आली आणि पुढे काही काळातच या दोघांच्या एकत्र कुटुंबाची सुरूवात झाली. राधाचा जन्म कॅनडात झाला असला तरीदेखील तिचा संपूर्ण संसारप्रवास हा भारतात झाला.

आपल्या प्रेमापोटी राधाने कॅनडा सोडलं आणि नंतर ती कायमची भारतीय झाली. राधाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तिला इंटेरियर डिझाईनचा चांगलाच गंध आहे. राधाने राजपालला कॅनडाहून आल्यावर पहिलं सरप्राईज दिलं होतं ते म्हणजे, तिने ते भेटलेल्या घराचं इंटेरियर अगदीच खास सजवलं होतं. राधा राजपालसाठी नेहमीच एक खास व्यक्ती राहिली आहे. राधाची नेहमीच राजपालला खं’बी’रपणे साथही लाभली आहे.

राजपाल बऱ्याचदा त्याच्या सोशल मीडियावर तिच्यासोबतचे फोटोजदेखील शेअर करत असल्याचं पहायला मिळतं आहे. राधा आणि राजपाल नेहमीच अन चांगल्या कपल्सचे उदाहरण असल्याचं पहायला मिळतं. छुप छुप के, ढोल, फिर हेरा फेरी, भुल, कुली नंबर 1, हंगामा यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!