लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना असते. सेलिब्रिटीच लग्न म्हणलं की जोरदार चर्चा, अ’फ’वा, मोठं सेलिब्रेशन सगळा झगमगाट आलाच. आणि त्यात जर आपल्या लाडक्या अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं लग्न असेल तर त्यांच्या चाहत्यांमध्ये तर वेगळंच वातावरण बघायला मिळतं.
अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाबाबत ही बरीच चर्चा सुरू आहे. ह्या महिन्याअखेर वरुण बोहल्यावर चढणार अशी चर्चा आहे. अखेर ह्या वृत्ताला वरुणच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे. येत्या 24 जानेवारीला वरुण त्याची बालमैत्रीण नताशासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
22 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान अलिबाग येथे पंजाबी पध्दतीने लग्नाचं मोठं सेलिब्रेशन होणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. जून 2019 पासून या दोघांमध्ये लग्नाची चर्चा होती, परंतु को’रो’ना’च्या सं’क’टा’मुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. या वृत्ताला वरुण धवन यांच्या जवळच्या एका सूत्राने दुजोरा दिला आहे.
कोण आहे नताशा दलाल? नताशा दलाल वरुणची बालमैत्रीण आहे. दोघेही 12वी पर्यंत सोबत शिकले आहेत. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत नताशाने खुलासा केला होता की ती अभ्यासासाठी परदेशात जाण्यापूर्वीच तिने वरूणसोबत डेटिंग करण्यास सुरुवात केली होती.
नताशा एक फॅशन डिझायनर आहे. तिने न्यूयॉर्कमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली. शिवाय अनेक सेलिब्रेटींसाठी फॅशन डिझायनर म्हणून काम केले आहे. लग्नासाठी ती स्वतः कपडे डिजाईन करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
नताशाने केलं होतं वरूणला रिजेक्ट ह्यापूर्वी वरुणने एका मुलाखतीत कबूल केले की नताशाने त्याला 3-4 वेळा नाकारले होते पण त्याने आशा सोडली नाही. बरीच वर्षे तो प्रयत्न करत राहिला. वरुणने नॉटिंगहॅम ट्रेंट येथे बिझिनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले.
करण जोहरच्या चॅट शोमध्ये केलं होतं कबूल वरुण आणि नताशा यांनी बर्याच वर्षांपासून आपल्या नात्याबद्दल बोलणे टाळले. अखेरीस, 2018 मध्येच वरुणने करण जोहरच्या चॅट शोमध्ये पहिल्यांदा नताशाला डेट करत असल्याचं कबूल केलं आणि लवकरच दोघे लग्न करणार असल्याचेही उघड केले होते.
त्यानंतर वरुण नताशाबद्दल बोलू लागला आणि वरुण आणि त्याच्या कुटुंबासमवेत तिलाही काही कार्यक्रमांमध्ये स्पॉट केले गेले. “ती अनेक वर्षांपासून माझ्या पालकांना ओळखत आहे. यापूर्वीही तिने माझ्या पालकांसह कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होती पण त्यावेळी त्याचे फोटोज घेण्यात आले नव्हते. ती माझ्या आयुष्यातील स्थिरकारक आहे. ती अगदी माझ्या कुटूंबासारखी आहे” असे वरुणने यापूर्वी फिल्मफेअरला सांगितले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.