सध्या कोरोना मुळे काही खास जरी बाहेर काही चालु झालं नसलं तरी काहींची कामे चांगली चालली आहेत. त्यात लग्न तर नुसते डिघाणे होतेय. त्याच्यात मग मराठी चित्रपट सृष्टी कशी मागे पडेल. बऱ्याच अभिनेत्याने आणि अभिनेत्री ने आता चांगली कामे करून चर्चेत राहून पुढं जाण्याचं ठरवलं आहे. आता एक ओळखीचा असा चेहरा की ज्याने खुप लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पूर्ण ही केला आहे.
अनेक चित्रपट त्या अभीनेत्याने केलेले आहेत. जो आता मालिकेत खूप भारी काम करत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो कोण ? चला तर मग मी सविस्तर जाणून घेऊ.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनेही बुधवारी ६ जानेवारी रोजी मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. तिच्या पाठोपाठ आता मराठी सृष्टीतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई पाहायला मिळते आहे.
काल ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता “आशुतोष कुलकर्णी” विवाहबंधनात अडकला आहे. आशुतोषने लेक माझी लाडकी, असंभव,साथ दे तू मला, गंध फुलांचा गेला सांगून , चेकमेट अशा विविध मालिका तसेच चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आज ८ जानेवारी २०२१ रोजी पुण्यामध्ये आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला धनश्री काडगावकर हिच्यासह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. आशुतोषची पत्नी देखील अभिनेत्री असून तिने ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘असे हे कन्यादान’ या मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत.
रुचिकाने इंजिनिअरिंग करत असताना २०१४ साली श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत ती सेकंड रनरअप ठरली. या यशानंतर मालिकेतून तिला अभिनयाची उत्तम संधी मिळाली.
अभिनयाव्यतिरिक्त रुचिकाला क्राफ्टिंग आणि पेंटिंगची विशेष आवड आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने सोशिअल मीडियावर यांच्या लग्नाची बातमी दिली आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
तस पाहिलं तर हा अभिनेता खरच भारी काम करतो. कामात उत्साह ठेवतो. जेणेकरून जीवात जीव येतो.
आशुतोष आणि रुचिकाला त्यांच्या आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…