नोरा फतेही ही एक अशी अभिनेत्री आहे की जी काम ही खूप सुंदर करते आणि त्याच सोबत सोशल मीडियावर नेहमी अपडेट असते. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो आता कशाबद्दल आहे ? काय वगैरे हे मात्र काही सांगता येणार नाही. पण चला सविस्तर जाणून तरी घेऊयात.

 

बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या डान्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेहीला सोशल मीडिया क्वीन म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. नोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

 

तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात. नुकताच नोराने एक तिचा डांन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे तिच्या या व्हिडिओमध्ये नृत्यदिग्दर्शक रजित देवसोबत दिसत आहे.

ही जोडी बोल्ड स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नोराने शॉर्ट्स आणि स्लीव्हलेस टॉप घातला आहे. नोराने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. नोराच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर साडेतीन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. नोराने काही दिवसांपूर्वीच तैमूर अली खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

करिना कपूर खानच्या चॅट शोमध्ये नोराने तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवली होती. नोरा म्हणाली होती की, तैमुर मोठा झाला की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. हे नोराचे बोलणे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली होती, करिना म्हणाली की, ठिक आहे पण तैमूर आता फक्त 4 वर्षाचा आहे त्याला लग्न करायला अजून बराच वेळ आहे. त्यावर नोरा हसत म्हणाली की, हरकत नाही तरीपण मी त्याच्यासाठी थांबेल.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डांसर थ्रीडी’ चित्रपटात ती दिसली होती. अलीकडेच ती गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडिओ सिंगल ‘नाच मेरी राणी’ मध्येही दिसली. नोरा फतेही सध्या अभिषेक दुधैय्या यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे.

या चित्रपटात नोरा अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

नोरा फतेही जर असच काम करत राहिली तर एक दिवस नक्कीच चर्चेत इतकी येईल. की प्रसिद्ध होऊन जाईल. आणि तिच्याकडे सगळं काही जिंकण्याची तयारी ही आहे. तर तिला पुढील भावी वाटचाली करिता खूप शुभेच्छा.