तरुणींच्या गळ्यातील ताईत अभिनेता म्हणजे कोण ? तर आज तसं पाहिलं तर अनेक नावे पुढे येतील. पण त्यातही आघाडी घेतलेलं नाव असेल ते म्हणजे रितिका रोशन या अभिनेत्याचं. आज त्याचा वाढदिवस आहे. पण या वाढदिवशी काही माहीत नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

 

की त्याला लग्नाच्या किती हजार मागण्या आल्या होत्या. इथं माणसाला एक यायला नाके नळ येतात पण हा माणूस वेगळाच होता. हजार म्हणजे किती मागण्या आल्या तेही आणि जीवनप्रवास तर तुम्ही थक्क व्हाल. चला तर मग सविस्तर पाहुयात.

 

लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस. २००० साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रातोरात तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

 

त्याच्या डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर तरुणी घायाळ होतात. वाढदिवसानिमित्त हृतिकबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात..

 

हृतिकने १९८० मध्ये पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केले. त्यावेळी त्याचे वय फक्त सहा वर्ष होते.

२१ व्या वर्षी हृतिक फार आजारी पडला होता. या आजारात हृतिकला मणक्याच्या हाडाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी तो कधीही डान्स करु शकत नाही असे म्हटले होते. पण त्याने अथक मेहनतीने त्याची नृत्य साधना सुरूच ठेवली. आज तो बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून ओळखला जातो.

हृतिकला फोटोग्राफीचीही आवड आहे. त्याच्या याच छंदामुळे हृतिक त्याची स्क्रॅपबूक नेहमीच अपडेट ठेवतो. या स्क्रॅपबूकमध्ये हृतिक त्याने काढलेले फोटो रोज अपडेट करतो.

हृतिकच्या चाहत्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. १४ फेब्रुवारी २००० मध्ये त्याला व्हेलेंटाइन डेला जवळपास ३० हजार लग्नाच्या मागण्या आलेल्या, असे हृतिक एका मुलाखतीत म्हटले होते.

ज्यावेळी हृतिक त्याच्या वडिलांना चित्रपटांच्या सेटवर मदत करत होता तेव्हा त्याने कलाकारांना चहा देण्यापासून ते अगदी केरसूणी मारण्यापर्यंतचे काम केले आहे.

हृतिकला लहानपणी अडखळत बोलायची सवय होती. पण आज त्याचे नाव बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध सुपरस्टार्समध्ये घेतले जाते.

एकेकाळी हृतिकही अन्य बॉलिवूड स्टार्सप्रमाणे चेन-स्मोकर होता. पण या व्यसनावर त्याने यशस्वीरित्या मात केली.

रितिक आज प्रसिद्ध अश्या अभिनेत्यामध्ये पाहिला जातो. त्याने केलेलं काम सुपर 30 मध्ये खूप ग्रेट असं होतं. लवकरचं तो आता नवीन सिनेमात ही दिसेन. त्यामुळे पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.