मनोरंजन इंडस्ट्रीत प्रसिध्द कलाकारांचं खरं आयुष्य कसं आहे ? ते काय करतात ? कुठं जातात ? अशी एक ना एक अपडेट ठेवायला रसिक प्रेक्षकांना फार उत्सुकता लागलेली असते.
आज आपण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबातील आयुष्यात दखल घालणार आहोत. त्याच्या मुलीने खरच पळून जाऊन लग्न केलं का ? ही माहिती जाणून घेणार आहोत.चला तर मग.
प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव आहे, जॅकी श्रॉफ. होय, आणि त्याला दोन मुलं आहेत, टायगर श्रॉफ हा मुलगा तर एक मुलगी. तिचं नाव काय ?
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफच्या मुलीने आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत. ती सोशल मीडियावर सतत कार्यरत असते.
तिने तिचा बॉयफ्रेंड एबन हैम्स बरोबरच्या टाकलेल्या फोटोमुळे लोक खूप चर्चा करत आहेत. चांगल्या वाईट रित्या तिला ट्रोल ही केलं जातं आहे.
एबननेही सोशल मीडियावर कृष्णाबरोबर एक फोटो शेअर करून ती पत्नी असल्याची पोस्ट केली आहे. ज्यामुळे सोशल मीडियाला चर्चेचा विषय मिळाला.
हे दोघेही नुकतेच एक डिनर डेटवर गेले होते. त्यावेळी काढलेल्या फोटोवर पोस्ट करत एबनने कृष्णाला पत्नी म्हणून टॅग केले आहे. त्याने टाकलेल्या पोस्टमुळे हे स्पष्ट झाले की, तो त्या नात्याबद्दल खरंच गंभीर आहे.
इकडे सोशल मीडियावर जी पोस्ट टाकली आहे त्यावर युजर्स कंमेंट करत आहे की यांनी खरंच लग्न केले आहे का?
सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोमुळे हे साफ समजते की त्यांच्या दोघांच्याही कुटुंबांना त्यांच्या नात्याबद्दल काही त्रास नाहीये. एबन हा एक बास्केटबॉल खेळाडू आहे.
त्याला ऑस्ट्रेलिया, इस्राईल आणि भारताची नागरिकत्व आहे. कृष्णाने तिचा भाऊ टायगर बद्दलही एक गोष्ट सगळ्यांना सांगितली होती. कृष्णा एकदा जुमच्या चॅट शोमध्ये गेली होती. दोघांनाही भावी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा..