बॉलिवूड अभिनेत्रींनीही पतीच्या दीर्घायुषी साठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि करवचौथ उत्सव आनंदाने साजरा केला आहे. यानिमित्ताने अभिनेत्री चांगले कपडे परिधान करून चंद्राची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या.

बर्‍याच जणींनी निर्जला व्रत ठेवले आणि मग चंद्राची पूजा करून उपवास उघडला.

करवाचौथ व्रताच्या सेलिब्रेशनची फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत, ज्यांना व्हायरल होण्यास जास्त वेळ लागला नाही. बॉलिवूड अभिनेत्री कश्या प्रकारे आयुष्य जगतात आणि त्या कशा राहतात ते पाहूयात

साध्या लाल साडी आणि लाल लिपस्टिकमध्ये प्रियंकाचा करवा चौथच्या वेळी खूपच सुंदर दिसत होती. तिने आपल्या गळ्यात मंगळसूत्रही घातले होते.

प्रियांका तिचा जबरदस्त साडी अवतार दाखवण्याशिवाय पती निक जोनाससोबतही रोमँटिक फोटोशूट करताना दिसली.

बॉलिवूडच्या देशी मुलीने अमेरिकेत करवा चौथ साजरे केले. तिने आपला पती निक जोनासच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देत उपवास ठेवले.

प्रियंकाने करवाचौथ सेलिब्रेशनची फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यांना व्हायरल होण्यास काहीच वेळ लागला नाही. ती आता खुप व्हायरल आणि ट्रोल होत आहेत.

प्रियांका गेली काही आठवडे जर्मनीमध्ये होती. जिथे ती तिच्या आगामी ‘मॅट्रिक्स 4’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. या आठवड्यात ती अमेरिकेत आली. अलीकडेच तिने निकसोबत एक फोटो शेअर केला जो खूप व्हायरल झाला आहे. निक्की आणि प्रियांकाने 2018 मध्ये लग्न केलेलं आहे.

या दोघांनीही भारतीय आणि ख्रिश्चन रीतिरिवाजांकडून म्हणून एकमेकांना निवडले. 2017 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारादरम्यान दोघांची भेट झाली. प्रियंकाला पाहून निकला खात्री झाली, की होणार तर हीच आपली बायको !…आज त्याने हे करून दाखवलं.

त्यांना दोघांना भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !..