Sukhi Mansacha Sadara Colors Marathi New Serial Bharat Jadhav (1)

 सुख नक्की कशात असतं ? खरंतर आपण ज्यामध्ये मानू त्यामध्ये ते असतं. तसं बघायला गेलं तर सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी… कोणासाठी पावसाची पहिली सर, तर कोणासाठी पावसाळ्यात मिळणारी सुट्टी…कोणासाठी सोनचाफ्याचा सुवास तर कोणासाठी तेच फूल बायकोच्या केसात माळणं..कोणी कुटुंबामध्ये आनंद शोधतं तर कोणी कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी झटत असतं…म्हणूनच कदाचित म्हणत असतील या सगळ्यापेक्षा आनंदी वृत्तीचा, सुख, समाधानाचा चष्मा डोळ्यांवर घालणं महत्वाचं… एकदा का तो घातला की सगळं जग सुंदर दिसू लागतं आणि आपलं संपूर्ण आयुष्यच मुळी न संपणारा आनंदमय उत्सव बनून जातं… ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ लहानपण विचारात नाही तर आचरणात असावं लागतं. आपली कुवत ओळखून ती स्वीकारता आली की मग जगण्यातील सहजता वाढते आणि आयुष्याचा प्रवास सुखकर होतो… साखरेच्या एका दाण्यावर मुंगी खुश असते, म्हणजेच अल्पसंतुष्टी हे जीवनातील आनंदाचं गमक आहे हे ती सांगून जाते… आपण नेहेमीच ऐकतो सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकालाच हवा असतो पण तो दुर्मिळ नाही, प्रत्येक माणूस तो त्याच्याकडे असलेल्या धाग्यांमधून विणू शकतो.. आणि हेच गमक आचारणात आणून आपलं आयुष्य जगणारे चिमणराव आणि त्यांचं सुखी कुटुंब येत आहे दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांच्या भेटीला. केदार शिंदे (स्वामी क्रिएशन्स) निर्मित आणि दिग्दर्शित ‘सुखी माणसाचा सदरा’२५ ऑक्टोबर रात्री ९.३० वा. आणि २६ ऑक्टोबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. केदार शिंदे या मालिकेद्वारे छोट्या पड्यावर पुनरागमन करणार असून महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव मालिकेत चिमणच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, श्रुजा प्रभुदेसाई, विजय पटवर्धन हे कलाकार मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

नात्यांचे बंध, एकत्र कुटुंब, आपल्या माणसांवरील प्रेम, हे सध्या कुठेतरी  हरवत चाललं आहे… प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. जे त्याच्याकडे नाहीये वा जे दुसर्‍याकडे आहे ते मिळवण्याच्या मागे धावतो आहे… पण याविरुध्द चिमणराव आणि त्यांची बायको कावेरी आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे जे त्यांच्या कुटुंबासोबत, एकमेकांच्या आनंदात आणि त्यांच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी आहेत… चिमण आणि त्याच्या कुटुंबाकडे रूढार्थाने सगळी सुखं  नाहीये पण त्यांनी तो आनंद, सुख एकमेकांमध्ये  शोधलं आहे… आणि म्हणूनच कुठल्याही संकंटावर ते हसतहसत मात करतात, वेळेला एकमेकांना आधाराचा हात देतात, वेळ पडली तर कानउघडणी करतात. संस्कार आणि नीतीमूल्य त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळेच जे या कुटुंबाकडे बघतात त्यांना ती गोष्ट हवी आहे जी चिमणरावांकडे आहे आणि ती म्हणजे’ सुखी माणसाचा सदरा’.

‘सुखी माणसाचा सदरा’ हा प्रत्येकाच्याच कपाटात असतो, फक्त तो काढून घालायचा असतो… देवाने प्रत्येक माणसाला आनंदाचं, समाधानाच कवचकुंडल देऊनच पाठवलं आहे… सुखी समाधानी रहाण्याचं रहस्य कळलं की प्रत्येक माणूस आनंदी होईल यात शंका नाही. ही मालिका बघत असताना प्रत्येक माणूस त्याला स्वत:ला, त्याच्या घरतील घटनांना या मालिकेशी जोडू शकेल आणि म्हणूच तर हा आपल्या घराचा आरसा आहे… उगाच हव्यास, मोठेपणा, ईर्षा यामागे सर्वस्व पणाला लावून, आपल्याजवळ असलेल्या सुखापासून दुरावण्यापेक्षा त्या सुखाच्या मृगजळामागे न धावता जे आहे त्यात सुख मानले पाहिजे हे खरं. खरा सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकाकडेच आहे, आपल्या माणसांच्या सहवासात आहे, आजीच्या प्रेमात आहे, नात्यांमध्ये आहे… आणि याचीच जाणीव करून देण्यासाठी येत आहे चिमणराव आणि त्यांचे कुटुंब तेंव्हा नक्की बघा आपल्या घराचा आरसा – ‘सुखी माणसाचा सदरा’२५ ऑक्टोबर रात्री ९.३० वा. आणि २६ ऑक्टोबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.