अभिनेता विजय सेतुपति यांनी श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज ” मुथय्या मुरलीधरन ” यांच्या बायोपिक ‘ 800 ‘ मधून आपले नाव काही कारणास्तव मागं घेतलं आहे. जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा पासून तमिळनाडूचं राजकारण प्रचंड तापलं होतं. आणि या प्रकरणात विजय सेतुपती यांचा तामिळ जनता आणि राजकारणी सतत विरोध करत होते.

अनेक राजकारण्यांनी तर चक्क विजय यांना या चित्रपटाची ऑफर नाकारण्याची विनंती केली. या सर्व त्रासानंतर अखेर विजय सेतुपती या प्रसिद्ध अभिनेत्याने आपले नाव या चित्रपटातून मागे घेतलचं.

हा एवढा मोठा निर्णय स्वत: विजय सेतुपती यांनी घेतलेला नाही, तर मुथय्या मुरलीधरन यांनी दोघांनी मिळून चर्चेतून घेतलेला आहे. असं आपण म्हणू शकतो. कारण मुथय्या मुरलीधरण यांनी एका प्रसिद्धीपत्रकात विजयला बायोपिक बनविण्याचा आपला निर्णय सोडून द्यावा, अशी विनंती केली होती.

कारण होत असलेला विरोध मुरलीधरन यांच्याही पचनी पडलेला नाहीये. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती, की कोणालाही त्याचं नुकसान होऊ नये.  सोशल मीडियावर मुथैयाच्या बायोपिकवर बरीच खळबळ उडाली होती. बिघडलेले वातावरण पाहून मुथय्या यांनी स्वतः विजयला हा चित्रपट न करण्यास सांगितले.

मुरलीधरन यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिलय की, ‘मला समजतय की ‘ विजय सेतुपति ” यांना माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपट स्वीकारल्यामुळे खूप दबाव येत आहे. काही लोक असे आहेत की ज्यांना हा चित्रपट बनवूनचं द्यायचा नाही. कारण काय ? भाषा आणि प्रांत वाद. माझ्यामुळे एखाद्या महान कलाकाराला त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही. कारण विनाकारण काही लोक मला खूप चुकीचं समजतायत, याचं खूप दुःख वाटतय.

माझ्यामुळे विजय सेतूपती यांना भविष्यात कसल्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही, म्हणून मी या बायोपिक वरील काम थांबवावं अशी विनंती करतो. मुरलीधरणचं हे प्रसिद्धीपत्रक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विजय सेतुपती आणि मुरलीधरण या दोघांच्या चाहत्यांना निराशेचा सामना करावा लागणार आहे. कारण आता दोघेही मिळून काम करणार नाहीत.

विजय सेतुपती ने स्वतः सोशल मीडियावर या गोष्टीची पुष्टी दिलेली आहे. पण जरी विजय सेतुपती यांनी हा चित्रपट सोडला असला तरी त्यावरचं काम मात्र थांबणार नाही, असं मुथ्यय्या मुरलीधरण यांनी म्हंटलेलं आहे.

या चित्रपटातुन अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. लवकरच आम्ही हा चित्रपट आपल्या भेटीस घेऊन येऊ असं मुरलीधरण यांनी म्हंटलं आहे.