पेरू हे सर्वात स्वस्त फळ. बहुतेक सर्व देशांत पेरू आढळतो. पेरूच्या दोन जाती प्रामुख्याने आढळतात. एका जातीत पांढरा गर असतो तर दुसर्यात तांबूस रंगाचा गर असतो. खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास “जाम’ किंवा “अमरूद’ असेही संबोधले जाते.
आवळ्याच्या खालोखाल भरपूर “क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या “व्हायरस’पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो.
शेकड्यात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील “क’ जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.
पेरूमधील फिकट रंगाचे लहानसे बी तेलयुक्त असते. या बियांपासून मिळणारे तेल सुवासिक असून आयोडिनयुक्त असते. त्याचा उपयोग औषध तयार करण्यासाठी केला जातो. पेरू जंतुनाशक तसेच वेदनाहारी आहे. तो तृषाशामकही आहे. पेरूमुळे भ्रमिष्टपणा नाहीसा होतो. वाताचा त्रास होत असल्यास पेरूचा रस द्यावा. पेरूच्या सेवनानेही वात नाहीसा होतो.
पेरूच्या सेवनाने बद्धकोष्ठता नष्ट होते. पेरूमध्ये पाचक गुणधर्मही आहेत. कातडी कमावण्यासाठी पेरूच्या पानांचा उपयोग होतो. कातडी वस्तू तयार करण्यापूर्वी त्यावर पेरूच्या पानांची प्रक्रिया करतात. यामुळे कातडीचा दर्जा उंचावतो. मळमळ, उलटी किंवा अतिसाराचा त्रास होत असल्यास पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो. हा काढा पचनशक्ती वाढवण्यासही गुणकारी ठरतो.
डायबिटीजपासुन वाचवते : पेरुमध्ये रिच फायबर कंटेंट आणि लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हे डायबिटीजपासुन वाचवते. लो ग्लायसेमिस इंडेक्स अचानक वाढणा-या शुगर लेव्हलला वाढण्यापासुन थांबवते. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे रेगुलेट होत राहते.
वजन कमी करण्यात मदत करते : पेरु मेटाबॉलिज्म वाढवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. अमरुद खाल्ल्यानंतर पोट देखील भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. कच्च्या पेरुमध्ये केली, अॅप्पल, ऑरेंज आणि ग्रेप्स सारख्या दुस-या फळांच्या तुलनेत जास्त शुगर असते.
बद्धकोष्ठता झाल्यास : पेरू शरीरातील मेटाबॉलिझम (चयापचय) समतोल ठेवल्यात मदत करते. यामुळे पेरूचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.