तारक मेहता कं उलटा चष्मा ह्या प्रसिद्ध मालिकेने हल्लीच अडीच हजार भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यातील अय्यरची भूमिका केली आहे,तनुज महाशब्दे या मराठी तरुणाने. त्याला पाहून कोणी म्हणणार नाही कि हा एक मराठी कलाकार आहे.

अय्यरच्या भूमिकेबाबत बोलतना तनुज म्हणाला, दहा वर्षांपासून मी ही भूमिका निभावत आहे, आणि या पात्राने माझी वेगळी ओळख निर्माण केली आहे, लोक मला ‘अय्यर काका’ म्हणूनच ओळखतात. जरी त्याचे सगळे मित्र त्याला तनुज म्हणून हाक मारत असले तरी त्याच्या मित्रांच्या मुलांसाठी तो अय्यर काकाच आहे. त्यांना तो खराखुरा अय्यर काका वाटतो.

तनुजच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्या वेळी वर्तमानपत्रात त्याचे खरे नाव छापून न येता ‘अय्यर काका यांच्या आईचे निधन’ अशी बातमी छापली गेली इतके त्याचे नाव या भूमिकेवर कोरले गेले आहे. ही बातमी वाचून अनेकांना हा प्रश्न पडला कि हा अय्यर असून याच्या आईचे नाव मराठी कसे काय ?

त्यावर मी मराठीच आहे , तनुज महाशब्दे हे माझे खरे नाव असे स्पष्टीकरण त्याने दिले. भूमिकेबद्दल विचारल्यावर तनुज सांगतो, मी एक मराठी कलाकार आहे, मुळचा इंदूरचा. दहा वर्षांपूर्वी जेव्हा त्याला ह्या भूमिकेची संधी मिळाली तेव्हा ही दाक्षिणात्य व्यक्तिरेखा वठवणे हे त्याच्यासाठी एक मोठे आव्हान होते.

हे पात्र रंगवताना त्याला दिलीपभाईं यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तब्बल वीस वर्षे रंगभूमीचा अनुभव असलेल्या दिलीपभाईंनी केलेली मदत ही खूप मोलाची ठरली. इतकी वर्षे आपापली भूमिका केल्यानंतर हे सगळे कलाकार अक्षरशः त्या त्या भूमिका जगत आहेत. या भूमिकांमध्ये ते इतके रमलेत कि एकमेकांना भेटतात तेव्हा शुटींगचालू आहे असेच त्यांना वाटत असते.

शुटींगच्या वेळीही त्यांना एकमेकांच्या घरी आहोत असा फील येतो. ह्या मालिकेचा सेट हे जणू त्यांचे कुटुंबच बनले आहे. या मालिकेने आता एक नवीन वळण घेतले आहे आणि या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिचे मालिकेत पुनरागमन होणार आहे. या पुनरागमनाची उत्सुकता सगळ्यानांच आहे.

तिची मुलगी लहान असल्या कारणाने ती सध्या काम करू शकत नाही. मालिकांमधून अनेकदा काही अडचणींमुळे कलाकार बदलले जातात, पण दयाबेनच्या बाबतीत तसे करणे कठीण आहे असे निर्मात्यांचे मत आहे. आणि म्हणूनच दयाबेन पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.