अमेरिकेतील फ्लोरिडाचे मूळ गुजरातचे रहिवासी असलेले डॉ. किरण पटेल आणि त्यांची पत्नी डॉ. पल्लवी यांची प्रसिद्ध देणगीदार म्हणून नोंद केली जाते. यामुळे ते बर्‍याचदा माध्यमांच्या बातम्यांमध्ये कायम राहतात. शिक्षण, क्रीडा, कला या क्षेत्रातील अनेक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. म्हणूनच फ्रीडम हेल्थचे मालक असलेल्या अब्जाधीश पटेल दाम्पत्याला फ्लोरिडामधील ‘द पॉवर कपल’ या शब्दाने संबोधले जाते. पण आता त्यांच्या आलिशान घरामुळे ते चर्चेत आहेत.

फ्लोरिडाच्या कॅरोलवुडमधील व्हाइट ट्राउट लेकजवळील 17 एकरवरील पटेल दाम्पत्याचा हा बंगला एका विलासी वाड्यासारखा दिसत आहे. कारण या घराची रचना भारतातील अनेक वाड्यांमधून प्रेरित आहे. इतकेच नव्हे तर फ्लोरिडामधील हे सर्वात मोठे घर आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारे भारतीय वंशाचे डॉ. किरण पटेल आणि त्यांची पत्नी डॉ. पल्लवी पटेल यांचा बंगला सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.

शिक्षण, खेळ, कला यासह अनेक क्षेत्रात पटेल दाम्पत्याने उल्लेखनीय योगदान दिलं आहे. फ्लोरिडामध्ये त्यांचा आलिशान बंगला आहे.

फ्लोरिडा शहरातील कॅरोलवूड परिसरातील व्हाईट ट्राऊट तलावाजवळ तब्बल 17 एकर जागेत त्यांचा मोठा बंगला आहे.

फ्लोरिडामधील हा सर्वात मोठा बंगला असून मुख्य इमारतीमध्ये 8400 फुटाच्या दोन विशाल विंग तयार करण्यात आल्या आहेत.

घरातील एका विंगमध्ये पटेल दाम्पत्य राहतात. तर दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा मुलगा आणि त्याचं कुटुंब राहतं.

आलिशान बंगल्यामध्ये मंदिर, मिनी थेटर, तीन गेस्ट हाऊस आणि 12 गाड्या उभ्या करता येतील इतकं मोठा पार्किंग एरिया आहे. तसेच स्टाफ हाऊस आणि कॉमन मेटेनेंस बिल्डिंगदेखील आहे.

बंगल्यापासून शाळा, विमानतळ, ऑफिस, हॉस्पिटल जवळ आहे. तसेच बंगला तयार करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या आलिशान बंगल्याची आहे 3.2 मिलियन डॉलर्स म्हणजेच 23 करोड रुपये.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.