मित्रांनो!, बॉलीवूड ही एक अशी मायानगरी आहे की जिथे, एखादी व्यक्ती रातोरात प्रकाशझोतात येते तर काही व्यक्ती आयुष्यभर काम करूनही साईडलाच पडून राहतात. काहींना सुपरहिट यश मिळते ते नीट पचवता येत नाही. तर काही घरगुती, पर्सनल, आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणास्तव बॉलिवूड पासून दूर होतात… केले जातात. बॉलीवूड मध्ये सुद्धा घराणेशाही, वारसा, गट तट, राजकारण, गॉसिप्स इ. प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालते.

एकतर इथे अभिनेत्रींच्या करियरला अभिनेत्यांपेक्षा नेहमीच दुय्यम स्थान देऊन कमी मानले जाते. पण श्रीदेवी, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, जूही चावला पासून तर करीना, अनुष्का, असा प्रवास करत अगदी आलिया भट पर्यंतची अशी अनेक नावे मात्र रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

बॉलीवूड जगतात अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी आपल्या कारकीर्दीत हिट चित्रपट दिले आणि बऱ्याच प्रसिद्ध सुद्धा झाल्या. परंतु वर उल्लेख केलेल्या कारणांपैकी काही कारणांमुळे त्या कालौघात विसरल्या गेल्या आणि आता त्या विस्मृतीत एकाकी जीवन जगत आहेत. चला तर जाणून घेऊ अशाच काही विस्मृतीत गेलेल्या तारकांबद्दल…

ममता कुलकर्णी – ममता कुलकर्णी यांनी काहीच चित्रपटांमध्ये काम केले, पण तिच्या कमी चित्रपटाच्या कारकीर्दीत तिने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या कारकीर्दीत अनेक हिट फिल्म्स देणारी ममता कुलकर्णी बॉलिवूडपासून दूर अज्ञात आयुष्य जगत आहे.

नम्रता शिरोडकर – ‘वास्तव’, ‘पुकार’, ‘जब प्यार किसी से होता है’, यासारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेल्या अभिनेत्री नम्रता शिरोडकरने 2004 साली स्वत: ला बॉलिवूडपासून दूर केले. साऊथचा सुपरस्टार महेश बाबूशी लग्नानंतर ती फक्त आपल्या कुटुंबावरच लक्ष केंद्रित करत आहे.

अनु अग्रवाल – महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ या चित्रपटामधून एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री अनु अग्रवाल आज बॉलीवूड इंडस्ट्रीपासून दूर विस्मृतीत जीवन जगत आहे. एका अपघातात त्यांची स्मरणशक्ती गमावली होती आणि त्यानंतर त्यांचे फिल्मी करियर संपुष्टात आले.

संदली सिन्हा – ‘तुम बिन’ या चित्रपटाने ओळख बनविणारी अभिनेत्री संदली सिन्हा हिने तिच्या कारकीर्दीत ‘पिंजर’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ यांसारख्या सारख्या सुपरहीट चित्रपटात काम केले आहे, पण ती यशस्वी झाली नाही. करिअर गमावल्यानंतर, संदली सिन्हाने बॉलिवूड मधून बाहेर पडली आणि आता ती आपल्या कुटुंबासमवेत सामान्य जीवन व्यतीत करत आहे.

प्रिया गिल – ‘सिर्फ तुम’ चित्रपटात यशस्वी ठरलेल्या प्रिया गिलची फिल्मी कारकीर्द अवघ्या 5 वर्षात संपली. हिट चित्रपट देऊनही प्रिया गिल आज इंडस्ट्रीपासून दूर असून विस्मृतीचे जीवन जगत आहेत. या आणि अशा कित्येक अभिनेत्री विस्मृतीत हरवल्या गेल्या आहेत. कधीतरी, कुठेतरी अचानक यांचा विषय निघतो… त्या काही क्षणांपुरते यांचे स्मरण होते पण, ते तात्पुरतेच… असो.