मित्रांनो! बॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘हम आपके हैं कौन’. या सुपरहिट चित्रपटात गाजलेल्या रीटाची व्यक्तिरेखा अभिनेत्री साहिला चड्ढा यांनी साकारली होती. तुम्हाला हे माहिती आहे का की फिल्मी जगापासून दूर या वेळी साहिला चड्ढा नेमके काय करीत आहे? जाणून घ्या.

नुकतेच बॉलिवूडमधील ‘हम आपके हैं कौन’ ता सुपरहिट चित्रपटाला २७ वर्षे पूर्ण झालीत. आज तब्बल २७ वर्षांनंतर सुद्धा हा चित्रपट लोकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासह जबरदस्त स्टारकास्टने सजलेल्या या चित्रपटाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. या चित्रपटातील गाजलेले एक पात्र म्हणजे अभिनेत्री साहिला चढा यांनी साकारलेली रीटाचे होते.

सदैव सुपरहिट ठरलेले दिग्गज दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांचा ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट वर्ष ११९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या कौटुंबिक चित्रपटाला लोकांनी खूप प्रेम दिले होते. आजही जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर येतो तेव्हा घरातील सर्व लोक टीव्हीच्या पडद्याकडे एकटक पहात बसतात. अभिनेत्री साहिला चढाने ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटात रीटाची भूमिका साकारली होती.

या चित्रपटाच्या कथेत रीटा तिच्या सलमान खान सोबतच्या लग्नाच्या नात्याबद्दल सतत बडबड करतांना दाखविली होती. सिनेमातील साहिला चड्ढाच्या भूमिकेची ही बडबड आणि तिची शैली प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. चित्रपटामध्ये, रिटाने सलमान खानला आपल्या प्रेमाकडे खेचण्याचे प्रयत्न केले आणि दरवेळी तिची होणारी गम्मत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करून गेली.

२००१ मध्ये शाहरुख खान आणि जूही चावला स्टारर वन टू का फोर या चित्रपटात साहिला चड्ढा अखेरची भूमिकेत दिसली होती. साहिला चढाने शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा आणि संजय दत्त या कलाकारांसोबत काम केले आहे. हम आपके हैं कौन व्यतिरिक्त, सहिला चड्ढाने ‘वीराना’, ‘अब इंसाफ होगा’, ‘नमक’, ‘आंटी नं 1’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

भोजपुरी सिनेमातही तिने दाखवलेली अभिनय क्षमता वाखाणणी करण्याजोगी होती. बॉलिवूड चित्रपटांशिवाय साहिला चढाने भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. या सह तिने टीव्ही सिरियल्स मध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. अभिनेत्री साहिला चड्ढाला मिस इंडिया इंटरनेशनलचा मुकुट देण्यात आला आहे.

सध्या ती आपला पती व मुलीच्या बरोबर विवाहित जीवनाचा आनंद लुटणारी एक सर्वसामान्य गृहिणी आहे. साहिला चड्ढा सध्या तिचा नवरा आणि अभिनेता निमय बालीसोबत राहत आहे. आता ती चित्रपटांपासून दूर आपल्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहे. त्यांना एक मुलगी राजकुमारी बाली आहे.

साहिलाचा पतीही एक अभिनेता आहे. अभिनेता निमय बाली हा संजय दत्तचा चुलत भाऊ आहे. निम बाली सुदधा बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये दिसत असतो. त्याने अनेक चित्रपट तसेच लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलेले आहे… अजूनही करत आहे.