सध्या सोशल मीडियावर चांगलं काही शोधण्यासाठी फार कसरत करावी लागते. चांगलं दुर्मिळ होत चाललंय आणि बाकी नुसतं व्हायरल. जे अवाढव्य आहे. पण काळजी करू नका. सध्या याच सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. तो आहे वयाची साठी पार केलेली आज्जीचा. आपल्याला उत्सुकता लागलेली असेल की आज्जी कोण ? व्हिडीओ कुठं वगैरे वगैरे.. तर चला मग जाणून घेऊयात. आज्जीची या वयातली यशोगाथा. जी खूप प्रेरणादायी.
नवरात्री महोत्सव सुरू आहे. सध्या प्रत्येक दिवशी देवीचा रोजचा रंग, वेगवेगळ्या रूपांचे व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत. पण अश्यात एक आज्जीचं स्त्रीवादी रूप आणि त्याचा व्हिडीओ ही खूप व्हायरल होत आहे. एका महिलेची जिद्द आणि इच्छाशक्ती म्हणजे काय असते ? याची प्रचिती येईल अशी माहिती आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
सायकलप्रेमी असलेल्या आज्जींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून आपल्या लक्षात येईल की 68 वर्षांच्या आज्जीबाई सायकल वरून 2 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. विश्वास नाही बसत; पण हे सत्य आहे.
इथं तरुण तडफदार सुद्धा दोन तीन किलोमीटर सायकलवर गेलं की कंटाळून जातात; पण आज्जीबाई चक्क 2 हजार किलोमीटर सायकलवरून प्रवास करणार आहेत. हे काही खायचं काम नाही.
कमरेला साडी खोचून लढाईला निघालेल्या अवतारासह आज्जीबाई तयार आहेत. बर त्या आज्जी एवढ्या लांब नेमकं चालल्यात कश्यासाठी ? तर वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी आज्जी चाललेल्या आहेत.
या आजी महाराष्ट्रमधील खामगावच्या आहेत. फिट भारत या ट्विटर अकाऊंटवर आज्जीच्या व्हिडीओ पडल्या पडल्या व्हायरल झाला आहे. सगळीकडून त्यांच्या अदभुत इच्छा शक्तीचं कौतुक होत आहे.
वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या आज्जीच्या व्हिडीओला लोकं कडक सलाम करत आहेत. व त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी देवाकडे हातही पसरवत आहेत. सध्या आज्जी सगळीकडे व्हायरल आहेत. खचलेल्या, पिचलेल्या अनेकांसाठी या आज्जी बाई एक प्रेरणादायी प्रवास ठरणार आहेत.
आज्जीच्या धाडसाला टीम स्टार मराठी चा कडक सलाम..