अजय-अतुलच्या संगीताची झिंग, हॉलिवूडमध्ये ‘सैराट’च्या गाण्यांचं रेकॉर्डिंग
अजय-अतुल या मराठमोळ्या संगीतकार जोडीने इतिहास रचला आहे. लॉस एंजेलिसच्या सोनी एमजीएम स्टुडियोमध्ये सैराट सिनेमातील सर्व गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे या स्टुडिओमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग करणारा ‘सैराट’ हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
अजय-अतुलच्या संगीताने सजलेल्या, नागनाथ मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे. त्यातच आता सोनी एमजीएम स्टुडिओमध्ये ‘सैराट’च्या याडं लागलं गं, झिंगाट यांसह सगळ्याच गाण्यांचं रेकॉर्डिंग लॉस एंजिलिसमधल्या सोनी एमजीएम या जगप्रसिद्ध स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं आहे. सोनी एमजीएम हा जगातील सर्वात अत्याधुनिक साऊंड स्टुडिओ मानला जातो. या स्टुडिओमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग करणारा ‘सैराट’ हा पहिला भारतीय चित्रपट असल्याचं बोललं जात आहे.
अजय-अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 66 परदेशी म्युझिशियन्सनी ‘सैराट’साठी मेहनत घेतली आहे. सोनी एमजीएम स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करण्याचा अनुभव खूपच वेगळा असल्याचं अजय आणि अतुल यांनी सांगितलं.