Actress Gauri Nalawade & Dancer Richa Agnihotri to Travel for Webseries Awesome Twosome

अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री झळकणार वेब सिरीजमध्ये!!
दिग्दर्शक संतोष कोल्हेंचे आता वेब सीरिजसाठी दिग्दर्शन !!
मराठी नववर्ष दिनापासून ‘व्हायरस मराठी’ हे यू ट्युब चॅनल सुरू होत असून ‘ऑसम टूसम’ या ट्रॅव्हल  वेब सिरीजचा पहिला एपिसोड २८ मार्च रोजी दुपारी ४वाजता अपलोड केला जाणार आहे.
अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री या दोघी बॅग पॅक करून फिरायला निघाल्या असून महाराष्ट्रातल्या गूढ, अगम्य जागा प्रेक्षकांना दाखवणार आहेत. या शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातला तरुण आज नवनवीन ठिकाणांना भेटी देत असतो,पण आडवाटेवरचा महाराष्ट्र या वेबसिरीज मध्ये दाखवला जाणार आहे. भटकंती मालिका करत असतानाच हा गूढ अगम्य आणि नैसर्गिक आश्चर्याने नटलेला महाराष्ट्र फिरायचा अशी कल्पना होती, असे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सांगितले.
द फिल्म क्लिक आणि कनेक्ट फिल्म्स या संस्थांनी या वेब चॅनलची निर्मिती केली आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रात व्हलगर, बोल्ड, शिवीगाळ अशा आशयाचा कंटेन्ट न देता, माणसाच्या जगण्यातल्या रोजच्या आयुष्यातल्या घडामोडींवर बेतलेल्या सिरीयस मालिका या चॅनल वर आपल्याला बघायला मिळणार आहेत.
व्हायरस मराठी या वेब चॅनलवर शॉक कथा ही फिक्शन वेबसिरीजही लवकरच अपलोड केली जाणार आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळ्या मालिका घेऊन येणारे यू ट्यूब चॅनल श्रीधर चिटणीस आणि संतोष कोल्हे हे घेऊन येत आहेत.