कोठारे हे नाव अनेक वर्षे मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक म्हणून गाजते आहे. कोठारेंची पुढची पिढी, अर्थात अभिनेता आदिनाथ कोठारे याने निर्मिती क्षेत्रातदेखील वेगळा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. कोठारे व्हिजनची निर्मिती असलेली ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ ही नवी मालिका लवकरच ‘झी युवा’ वाहिनीवर सुरु होत आहे. या आगळ्या निर्मिती करणाऱ्या आदिनाथसोबत मारलेल्या गप्पा;
१. ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ या मालिकेच्या संकल्पनेविषयी आम्हाला थोडंसं सांग.
इच्छाधारी नागीण या विषयावर एखादी मालिका सुरु करायची एवढाच विचार डोक्यात होता. पण, या संकल्पनेविषयी आणखी चर्चा सुरु झाली, आणि त्यानंतर या विषयाने एक वळण घेतलं. त्यामुळे हलकीफुलकी पण तरीही ‘मॅड’ अशी एक भन्नाट विनोदी मालिका तयार झाली. म्हणूनच तिला ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ असं निराळं नाव देण्यात आलं. ‘इच्छाधारी नागीण’ हा विषय वेगळ्या प्रकाराने मांडण्यात येतो आहे. एक उत्तम ‘सिटकॉम’ पाहण्याची संधी आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.
२. ही एक वेगळ्या धाटणीची मालिका आहे. या निर्मितीचा अनुभव नक्की कसा आहे?
मुख्य भूमिकेत दोन्ही नवे चेहरे आम्हाला हवे होते. अशावेळी सुंदर आणि आकर्षक चेहरा आणि त्याला उत्तम अभिनयाची जोड मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट ठरते. असे कलाकार शोधण्याचं काम नक्कीच कठीण होतं. त्यामुळे, या मालिकेच्या निमित्ताने कास्टिंग हे सगळ्यात मोठं आव्हान ठरलं. २५० ऑडिशन्स घेतल्यानंतर हे उत्कृष्ट कलाकार आम्हाला मिळाले आहेत. सगळ्या टीमची भट्टी उत्तम जमून आली आहे. त्यामुळे मालिका चांगली होईलच आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल.
३. व्ही. एफ. एक्स. तंत्रज्ञानाचा या मालिकेत फार महत्त्वाचा वाटा आहे. तंत्रज्ञानाच्या वापराविषयी तुमचे काय मत आहे?
इच्छाधारी नागीण हा विषय असल्यामुळे स्क्रीनवर नागीण दाखवणं हा मुख्य मुद्दा ठरतो. यासाठीच व्ही. एफ. एक्स तंत्राचा वापर करावा लागतो. ‘थ्रीडी’ ऍनिमेशन करण्यासाठी प्रतिभावंत व्ही. एफ. एक्स. कलाकार लागतात. खूप वेळ आणि पैसे सुद्धा यासाठी खर्च होतात. मालिकेच्या डेडलाईन सांभाळून हे सगळं करणं, हे मोठं आव्हान होतं. पण, आमच्या टीमने ते यशस्वीपणे पेललं आहे. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर झालेला आहे. प्रेक्षकांना २८ ऑक्टोबरपासून ते अनुभवायला मिळणारच आहे. व्ही. एफ. एक्स.च्या वापरामुळे प्रेक्षकांना ही मालिका आणखी अब्देल यात शंका नाही.
४. या मालिकेविषयी ‘झी युवा’च्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल?
‘झी युवा’ नेहमीच काहीतरी नवीन कथानक घेऊन येते. तसंच यावेळी सुद्धा एक नवी संकल्पना ही वाहिनी घेऊन येत आहे. इच्छाधारी नागीण, हा विषय कॉमन होऊ लागलेला असला, तरी हा विषय विनोदी ढंगात ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ या मालिकेतून मांडला जाणार आहे. तोच विषय एका भन्नाट आणि हटके स्टाईलने पाहायला मिळणार आहे. तेव्हा, २८ ऑक्टोबर पासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता, ‘झी युवा’ वाहिनीवर पाहायला विसरू नका, नवी मालिका ‘प्रेम, पॉयजन, पंगा’!!!