Loading...

मानस आणि वैदेहीची प्रेमकहाणी असलेल्या झी युवावरील ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मानस-वैदेहीचं प्रेम प्रेक्षकवर्गाला नेहमीच आकर्षित करतं. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता यशोमान आपटे गेले काही दिवस जोरात काम करतोय.

Loading...

Loading...

या मालिकेच्या चित्रीकरणासाठी महिन्यातले २५-२६ दिवस तो सेटवरच असतो. गेल्या अडीच वर्षात त्यानं फारशी कधी सुट्टीही घेतलेली नाही. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे लवकरच ही मालिका सातशे भागांचा टप्पा गाठणार आहे. या निमित्तानं मालिकेतलं एकविसावं गाणंसुद्धा यशोमानवर चित्रीत होणार आहे.

Loading...