Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे… आज या टास्क दुसरा दिवस असून टीम B मधील सदस्य शेतकरी आणि टीम A मधील सदस्य कीटक बनतील. टीम A ने काबीज केलेल्या शेतजमिनी व्यतिरिक्त उर्वरित जमीन टीम B ला आजच्या कार्याच्या सुरुवातीला शेती करण्यासाठी मिळणार आहे. या कार्यामध्ये दोन्ही टीमने आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता बघूया या टास्कमध्ये कोण बाजी मारेल ? कोणचे कोणाशी कोणाचे वाद होतील ? नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आरोह वेलणकर वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आला… आणि आता त्याचा घरातला हा पहिलाच टास्क असून या टास्कमध्ये आज त्याचा वाद नेहाशी होणार आहे… किशोरी आणि नेहा आपापल्या टीमच्या मुकादम आहेत… बझर वाजल्यानंतर विरोधी टीमने लावलेली फुलं मोजून त्यांची संख्या बोर्डवर लिहायची आहे… आणि याचवेळेस नेहाचे म्हणणे आहे ज्या फुलांच्या कंड्या तुटल्या आहेत ती फुलं मी नाही मोजणार, कारण इतकी लहान काडी आमची देखील काल मोजली नव्हती… त्यावर आरोह म्हणाला काहीच संबंध नाहीये… नेहा चिडायचे नाही आणि चीटिंग नाही करायची… त्यावर शिवानीचे म्हणणे होते बरोबर आहे संचालिकेचा नियम आहे. किशोरीचे म्हणणे आहे मी आजू फुलं मोजली नाही आहे थांब… हीनाने देखील सांगितले तिला हात लावायला देऊ नका, तू काल करत असताना कोणीच काही बोले नाही नेहा”.

Loading...

या सगळ्या वादावर नेहाने “मी मोजणारच नाही, आणि अप्रूव्ह पण नाही करणार”. असे सांगितले … आरोहचा पारा हा म्हणण्यावर चढला आणि तो म्हणाला त्याचा संबंधच नाहीये नेहा. तुझ्यावर काही नाहीये. नेहाचे म्हणणे होते, मी विरुध्द टीमचा मुकादम आहे मी जे ठरवणार ते फाईनल. आणि वाद वाढतच गेला.

बघुया आजच्या भागामध्ये पुढे टास्कमध्ये काय होते ?

Loading...